/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.२१: ‘संपर्क से समर्थन’ अर्थात ‘महाविजय २०२४’ अभियानाचा शुभारंभ करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बुधवारी(ता.२३) गडचिरोलीत येत आहेत.
भाजपच्या अनुसूचित जमाती आघाडीचे राष्ट्रीय सरचिटणीस खा. अशोक नेते यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले की, २०२४ मध्ये होणारी लोकसभा निवडणूक जिंकण्याचा चंग भाजपने बांधला आहे. त्यासाठी पक्षाने ३० मे ते ३० जून या कालावधीत महाजनसंपर्क अभियान राबविले. हे अभियान पुढे राबविण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘संपर्क से समर्थन’ अर्थात ‘महाविजय २०२४’ अभियान राबविण्याचे भाजपचे ठरविले आहे. त्यासाठी बुधवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे गडचिरोलीत येणार आहेत. सकाळी साडेदहा वाजता ते त्रिमूर्ती चौकातून नागरिकांच्या भेटी घेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक घिसुलाल काबरा यांच्या निवासस्थानी पोहचतील. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते सुमानंद सभागृहात आयोजित पक्ष पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा क्षेत्रातून बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख असे प्रत्येकी शंभर पदाधिकाऱी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमानंतर बावनकुळे यांच्या हस्ते खा.अशोक नेते यांच्या वॉर रुमचे उद्घाटन होईल. बावनकुळे यांच्यासमवेत पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती खा.नेते यांनी दिली.
पत्रकार परिषदेला भाजपचे लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, लोकसभा विस्तारक बाबूराव कोहळे, किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य रमेश भुरसे, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश बारसागडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.