/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.२: अहेरी येथील धर्मराव शिक्षण मंडळाद्वारा संचालित धर्मराव कृषी विद्यालयातील सहायक शिक्षिका जयश्री विजय खोंडे यांची राज्य शासनाने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड केली आहे.
शिक्षक दिनी ५ सप्टेंबर रोजी मुंबई येथे त्यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
जयश्री खोंडे यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग दर्शविला असून, मराठी विज्ञान परिषद, अंधश्रद्धा निर्मुलन समिती, कृषी संशोधन, सांस्कृतिक कार्यक्रम, महिला सक्षमीकरण, राष्ट्रीय हरीत सेना, तसेच शासनाचे नावीन्यपूर्ण उपक्रम हिरीरीने राबविले आहेत.
पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल जयश्री खोंडे यांचे चाहत्यांनी अभिनंदन केले आहे.