/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.३: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या आवाहनानुसार, जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आजपासून जनसंवाद पदयात्रेला सुरुवात झाली. विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडादेव येथून यात्रा काढण्यात आली आहे.
मार्कंडादेव, फराडा, फोकुर्डी, भेंडाळा इत्यादी ठिकाणी ही यात्रा पोहचणार आहे. मोदी सरकारच्या काळात वाढलेली महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, अन्याय, अत्याचार आणि अन्य मुद्द्यांवर काँग्रेस नेते नागरिकांमध्ये जनजागृती करणार आहेत जिल्हाभरात दोनशे किलोमीटरपर्यात ही यात्रा फिरणार आहे. या यात्रेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, माजी खासदार मारोतराव कोवासे, प्रदेश महासचिव डॉ.नामदेव किरसान, आदिवासी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, माजी आमदार आनंदराव गेडाम, प्रदेश सचिव डॉ.नितीन कोडवते, प्रदेश उपाध्यक्ष पंकज गुड्डेवार युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विश्वजित कोवासे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अॅड.कविता मोहरकर, प्रदेश सचिव डॉ.चंदा कोडवते, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष हसन गिलानी, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष वामनराव सावसाकडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी झाले आहेत.