/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
मुंबई, ता.१२:विद्यापींठानी पुढाकार घेऊन आपले आणि अधिनस्थ महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन करून घ्यावे, अन्यथा नॅक मूल्यांकन न करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करावी, असे आदेश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
आज मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाविद्यालयांच्या नॅक
मूल्यांकनसंदर्भात कुलगुरूंची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण विभागाचे संचालक शैलेंद्र देवळाणकर यांच्यासह मुंबई, गडचिरोली, जळगाव, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड इत्यादी विद्यापींठाचे कुलगुरू उपस्थित होते.
मंत्री श्री.पाटील म्हणाले, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणासाठी विद्यापीठे व महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन करून घेणे महत्वाचे आहे. परंतु अनेक महाविद्यालयांकडून नॅक मूल्यांकन केले जात नाही. याबाबत संबंधित विद्यापींठानी नॅक मूल्यांकनासाठी स्थानिक पातळीवर अशा महाविद्यालयांच्या काय अडचणी आहेत,याबाबत पडताळणी करावी आणि नॅक मूल्यांकन नकरणाऱ्या महाविद्यालयांची पुढील शैक्षणिक वर्षांपासून प्रवेश प्रक्रिया रोखणे, महाविद्यालयांची संलग्नता रद्द करणे अशी कारवाई सुरू करावी,अशा सूचनाही मंत्री श्री. पाटील यांनी केल्या.
नॅक मूल्यांकनाच्या प्रक्रियेत बदल करून ही प्रक्रिया सहज, सुलभ आणि अधिक सोपी व्हावी.त्यामुळे ग्रामीण भागातील महाविद्यालये नॅक मूल्यांकनसाठी पुढे येतील,असे बैठकीत कुलगुरूंनी सांगितले. याबाबत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना पत्र पाठवून कळविण्यात येईल, असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
…………..