मंगळवार, 7 मे 2024
लक्षवेधी :
  बालंबाल बचावले गडचिरोलीचे पोलिस! टिपागड पहाडावर आढळली शक्तीशाली स्फोटके             जादुटोण्याच्या संशयावरुन वृद्धाला दिले तप्त सळाखीचे चटके, एटापल्ली तालुक्यातील दुसरी घटना             जादुटोणा प्रकरण: दोघांना जिवंत जाळणाऱ्या १५ आरोपींना ५ दिवसांची पोलिस कोठडी             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             आयपीएलवर ऑनलाईन सट्टा: दोघांवर गुन्हे दाखल, देसाईगंज पोलिसांची कारवाई             गडचिरोली जिल्हा हादरला: जादुटोण्याच्या संशयावरुन दोघांना जीवंत जाळले, १४ जणांना अटक, एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा येथील घटना           

खोरिपाचे राज्यस्तरीय अधिवेशन २६ सप्टेंबरला ब्रम्हपुरीत

Thursday, 21st September 2023 07:51:05 AM

ब्रम्हपुरी,ता.२१:रिपब्लिकन पक्षाचे (खोरिपा) राज्यस्तरीय अधिवेशन बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जयंतीनिमित्त २६ सप्टेंबर २०२३ रोजी ब्रम्हपुरी येथील राजीव गांधी सभागृहात आयोजित करण्यात आले आहे,

एक दिवसीय अधिवेशनात पहिल्या सत्रात दुपारी १२ वाजता परिसंवाद आयोजित करण्यात आला असून,‘देशाच्या वर्तमान परिस्थितीवर रिपब्लिकन पक्षाची भूमिका’ हा परिसंवादाचा विषय असणार आहे. रिपब्लिकन पक्षाचे तेलंगणा राज्याचे अध्यक्ष महेश बाबू यांच्या हस्ते परिसंवादाचे उद्घाटन होणार असून, खोरिपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष.भाऊ निरभवणे अध्यक्षस्थानी राहतील.प्रमुख मार्गदर्शक म्हणून पक्षाचे राष्ट्रीय संघटन सचिव उत्तमराव गवई, राष्ट्रीय प्रवक्ते प्रा.डॉ.एन.व्ही ढोके,माजी प्राचार्य डॉ.सिद्धार्थ मेश्राम,केंद्रीय कार्यकारिणी सदस्य.प्रशिक आनंद उपस्थित राहणार आहेत,

खुले अधिवेशन दुपारी ४ वाजता होणार आहे.यावेळी खोरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी आमदार उपेंद्र शेंडे, राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा माजी प्राचार्य डॉ.गोपीचंद मेश्राम, छत्तीसगडचे प्रदेशाध्यक्ष ओमप्रकाश मेश्राम, मध्यप्रदेशचे अध्यक्ष ऍ़ड.राम बिहारी शुक्ला, तामिळनाडूचे अध्यक्ष के पी सुंदरप्रथबन, राष्ट्रीय सरचिटणीस देशक खोब्रागडे,प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब देशमुख, प्रदेश सरचिटणीस जीवन बागडे, मुंबई प्रदेशाध्यक्ष भागवत कांबळे, सरचिटणीस विक्रांत पाटील, महिला आघाडीच्या विदर्भ प्रदेशाध्यक्ष संघमित्रा खोब्रागडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष प्रा.डॉ.देवेश कांबळे यांनी केले आहे.

  


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
4A019
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना