सोमवार, 6 मे 2024
लक्षवेधी :
  बालंबाल बचावले गडचिरोलीचे पोलिस! टिपागड पहाडावर आढळली शक्तीशाली स्फोटके             जादुटोण्याच्या संशयावरुन वृद्धाला दिले तप्त सळाखीचे चटके, एटापल्ली तालुक्यातील दुसरी घटना             जादुटोणा प्रकरण: दोघांना जिवंत जाळणाऱ्या १५ आरोपींना ५ दिवसांची पोलिस कोठडी             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             आयपीएलवर ऑनलाईन सट्टा: दोघांवर गुन्हे दाखल, देसाईगंज पोलिसांची कारवाई             गडचिरोली जिल्हा हादरला: जादुटोण्याच्या संशयावरुन दोघांना जीवंत जाळले, १४ जणांना अटक, एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा येथील घटना           

रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी

Thursday, 25th April 2024 11:07:33 PM

गडचिरोली, ता. २६: भामरागड तालुक्यातील कियर  येथील एका शेतक-यास दुपारी ठार केल्यानंतर रात्री त्याच रानटी हत्तीने हिदूर गावात धुडगूस घालून तीन महिलांना गंभीर जखमी केले. महारी देवू वड्डे (५०), राजे कोपा आलामी (५०) आणि वंजे जुरू पुंगाटी अशी जखमी महिलांची नावे आहेत. तेलंगणा राज्यात दोन शेतकऱ्यांना ठार करून तीन दिवसांपूर्वी रानटी हत्तीने भामरागड तालुक्यात प्रवेश केला. काल पहाटे या तालुक्यातील कोसफुंडी गावात सर्वप्रथम हत्तीचे दर्शन झाले. त्यानंतर तो कारमपल्ली-टेकला जंगलात गेला. त्यानंतर दुपारी ४ वाजताच्या सुमारास कियर येथील शेतशिवारात काम करीत असलेल्या गोंगलू तेलामी नामक शेतक-यास हत्तीने  ठार केले. त्यानंतर हा हत्ती त्या भागातून पसार होऊन आरेवाडा परिसरातील हिदूर या गावात गेला. सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास त्याने महारी वड्डे, राजे आलामी व वंजे पुंगाटी यांना गंभीर जखमी केले. तिन्ही महिलांना भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले., मात्र दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याने त्यांना चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

एका महिलेचे दोन्ही पाय व पोटाला गंभीर इजा झाल्याने तिची प्रकृती चिंताजनक आहे, तर दोघींना कायम अपंगत्व येण्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 

 

 

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
6WARV
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना