मंगळवार, 7 मे 2024
लक्षवेधी :
  बालंबाल बचावले गडचिरोलीचे पोलिस! टिपागड पहाडावर आढळली शक्तीशाली स्फोटके             जादुटोण्याच्या संशयावरुन वृद्धाला दिले तप्त सळाखीचे चटके, एटापल्ली तालुक्यातील दुसरी घटना             जादुटोणा प्रकरण: दोघांना जिवंत जाळणाऱ्या १५ आरोपींना ५ दिवसांची पोलिस कोठडी             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             आयपीएलवर ऑनलाईन सट्टा: दोघांवर गुन्हे दाखल, देसाईगंज पोलिसांची कारवाई             गडचिरोली जिल्हा हादरला: जादुटोण्याच्या संशयावरुन दोघांना जीवंत जाळले, १४ जणांना अटक, एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा येथील घटना           

संत निरंकारी मंडळाच्या शिबिरात १८८ जणांनी केले रक्तदान

Friday, 26th April 2024 06:34:29 AM

देसाईगंज,ता.२६: येथील संत निरंकारी मंडळाच्या वतीने संत निरंकारी सत्संग भवनात आज आयोजित रक्तदान शिबिराला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यात १६४ पुरुष आणि २४ महिला अशा एकूण १८८ जणांनी रक्तदान केले.

आ.कृष्णा गजबे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. संत निरंकारी मंडळाचे नागपूर झोनल इंचार्ज किशन नागदेवे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. निरंकारी मंडळाचे संयोजक आसाराम निरंकारी, सेवादलाचे क्षेत्रिय संचालक हरीश निरंकारी, साईबाबा मंदिराचे अध्यक्ष नरेश विठ्ठलानी, गडचिरोली येथील रक्तपेढीचे डॉ.अशोक तुमरेडी, सतीश ताडकलवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. रक्तदानासारखे ईश्वरीय कार्य करणे हीच संत निरंकारी मंडळाची ओळख झाले भावोद्गार आमदार कृष्णा गजबे यांनी यावेळी काढले. जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढी विभागाने रक्तटंचाई झाल्यामुळे संत निरंकारी मंडळाला रक्तदान शिबिर घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार मानवसेवेसाठी रक्तदान शिबिर आयोजित केल्याचे किशन नागदेवे यांनी सांगितले.

संत निरंकारी मंडळाच्या वतीने २४ एप्रिलला सदगुरु बाबा गुरबचनसिंहजी महाराज तथा अन्य हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मानव एकता दिवस साजरा करण्यात येतो. त्यानुसार सर्व जिल्हा केंद्रे आणि इतर मुख्य ठिकाणी रक्तदान शिबिर घेण्यात येते. त्यानंतर आवश्यकतेनुसार इतर ठिकाणी रक्तदान शिबिरे घेतली जातात.

रक्त संकलनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढी विभागाच्या चमूने सहकार्य केले. यावेळी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱी आणि प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांनी रक्तदात्यांची तपासणी केली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
ST465
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना