बुधवार, 8 मे 2024
लक्षवेधी :
  बालंबाल बचावले गडचिरोलीचे पोलिस! टिपागड पहाडावर आढळली शक्तीशाली स्फोटके             जादुटोण्याच्या संशयावरुन वृद्धाला दिले तप्त सळाखीचे चटके, एटापल्ली तालुक्यातील दुसरी घटना             जादुटोणा प्रकरण: दोघांना जिवंत जाळणाऱ्या १५ आरोपींना ५ दिवसांची पोलिस कोठडी             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             आयपीएलवर ऑनलाईन सट्टा: दोघांवर गुन्हे दाखल, देसाईगंज पोलिसांची कारवाई             गडचिरोली जिल्हा हादरला: जादुटोण्याच्या संशयावरुन दोघांना जीवंत जाळले, १४ जणांना अटक, एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा येथील घटना           

उद्धव ठाकरेच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

Saturday, 26th July 2014 10:44:12 PM

गडचिरोली, ता. २६ : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ५४ व्या वाढदिवानिमित्त रविवारी २७ जुलैला शिवसेनेतर्फे आरमोरी व गडचिरोली येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवारी सकाळी आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करून रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे.या शिबिरात रक्तगट, मधुमेह, रक्तदाब तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. नागरिकांनी या शिबिराचा लाभघ्यावा, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख हरीश मने, माजी आ. डॉ. रामकृष्ण मडावी, उपजिल्हाप्रमुख राजू अंबानी, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख हेमलता वाघाडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख कवडू सहारे, महिला तालुका प्रमुख कल्पना तिजारे, युवासेना जिल्हाप्रमुख अमित बेहरे, अमर खरवडे, उपजिल्हा प्रमुख सूरज हेमके, तालुका प्रमुख पुरुषोत्तम सोनटक्के, गणेश तिजारे, पंकज आखाडे, कुणाल डोकरे, सचिन जोध, योगेश देविकार, पराग धकाते, विनोद निकुरे आदींनी केले आहे. 

 

गडचिरोली:  येथे उद्या २७ जुलै २०१४ रोजी  सकाळी ८ वाजता सायकल दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा चामोर्शी मार्गावरील शिवसेना कार्यालय ते शिवणी व शिवणी येथून शिवसेना कार्यालय अशी घेण्यात येणार आहे. स्पर्धेतील प्रथम विजेत्यास ५००१ रूपये, तर व्दितीय विजेत्या स्पर्धकाला ३००१ रूपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. सायकल दौड स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धेकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार, उपशहर प्रमुख राजू कावळे, गजानन नैताम, चांगदास मसराम, ज्ञानेश्वर बगमारे, राहुल सोरते, पुनेश्वर उडान,देवाजी गेडाम, योगेश कुडवे, सुनील नक्षिणे, देवेंद्र मोगरकर, भूषण गावतुरे, मनोज उरकुडे, उत्तम राऊत, धनंजय कुळवे, प्रेमदास आदे आदींनी केले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
UK22S
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना