बुधवार, 8 मे 2024
लक्षवेधी :
  बालंबाल बचावले गडचिरोलीचे पोलिस! टिपागड पहाडावर आढळली शक्तीशाली स्फोटके             जादुटोण्याच्या संशयावरुन वृद्धाला दिले तप्त सळाखीचे चटके, एटापल्ली तालुक्यातील दुसरी घटना             जादुटोणा प्रकरण: दोघांना जिवंत जाळणाऱ्या १५ आरोपींना ५ दिवसांची पोलिस कोठडी             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             आयपीएलवर ऑनलाईन सट्टा: दोघांवर गुन्हे दाखल, देसाईगंज पोलिसांची कारवाई             गडचिरोली जिल्हा हादरला: जादुटोण्याच्या संशयावरुन दोघांना जीवंत जाळले, १४ जणांना अटक, एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा येथील घटना           

स्व. नामदेवराव पोरेड्डीवारांच्या तैलचित्राचे आज अनावरण

Sunday, 27th July 2014 09:56:42 AM

गडचिरोली, ता. २७ : कृषी उत्पन्न बाजार समिती आरमोरी व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संयुक्त विद्यमाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्थापनेस 50 वर्षाहून अधिक कालावधी पूर्ण झाल्याचे औचित्य साधून माजी आ. स्व. नामदेवराव सावकार पोरेड्डीवार यांच्या तैलचित्राचे अनावरण, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत साक्षरता केंद्राचे उद्घाटन व वैरागड येथील भांडारेश्वर देवस्थान समितीद्वारे प्रकाशित ‘वैरागडचा इतिहास’ या पुस्तकाचे विमोचन इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन सोमवारी 28 जुलै रोजी करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे पर्यावरण व सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थानी आ. प्रा. जोगेंद्र कवाडे तर प्रमुख अतिथी म्हणून माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे, आ. आनंदराव गेडाम, सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार, नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश सावकार पोरेड्डीवार उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, उपाध्यक्ष डॉ. बलवंत लाकडे, मानद सचिव त्रि. गो. दुबे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. पी. आयलवार, नाकाडे, ईश्वर पासेवार, ए. डी. निमजे यांनी केले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
HTFYJ
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना