रविवार, 5 मे 2024
लक्षवेधी :
  जादुटोणा प्रकरण: दोघांना जिवंत जाळणाऱ्या १५ आरोपींना ५ दिवसांची पोलिस कोठडी             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             आयपीएलवर ऑनलाईन सट्टा: दोघांवर गुन्हे दाखल, देसाईगंज पोलिसांची कारवाई             गडचिरोली जिल्हा हादरला: जादुटोण्याच्या संशयावरुन दोघांना जीवंत जाळले, १४ जणांना अटक, एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा येथील घटना             ठाणेगाव येथून १८ लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त, तिघे जण ताब्यात: स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई             छत्तीसगडमधील चकमकीत गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत चार नक्षल कमांडर ठार           

काँग्रेस नेते रवींद्र दरेकर यांना म.गांधी मानव सेवा पुरस्कार जाहीर

Sunday, 1st October 2023 06:17:33 AM

गडचिरोली,ता.३०: आरमोरी येथील मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे संचालित म.गांधी कला, विज्ञान व स्व.नसरुद्दीन पंजवानी वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा महात्मा गांधी मानव सेवा पुरस्कार काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र दरेकर यांना जाहीर झाला आहे.

२ ऑक्टोबरला महाविद्यालयात आयोजित महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीदिनी सकाळी ९.४० वाजता दरेकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल. याच कार्यक्रमात कला शाखेतून प्रथम क्रमांक पटकावणारी गायत्री चौके, विज्ञान शाखेतील शुभांगी निमजे व वाणिज्य शाखेतील हिमांद्री गाईन यांचाही सत्कार करण्यात येणार आहे. संस्थेचे सचिव मनोज वनमाळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार असून, विशेष अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष नूरअली पंजवानी तर प्रमुख वक्ते म्हणून ब्रम्हपुरी येथील माजी प्राचार्य डॉ.नामदेव कोकोडे उपस्थित राहणार आहेत.

नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या अध्यक्ष सुनीता वनमाळी, प्राचार्य डॉ.लालसिंह खालसा, प्राचार्य साईनाथ अद्दलवार, मुख्याध्यापक प्रकाश पंधरे, नितीन कासार, प्रा.शशिकांत गेडाम व प्रा.सतेंद्र सोनटक्के यांनी केले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
4KBH9
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना