रविवार, 5 मे 2024
लक्षवेधी :
  जादुटोणा प्रकरण: दोघांना जिवंत जाळणाऱ्या १५ आरोपींना ५ दिवसांची पोलिस कोठडी             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             आयपीएलवर ऑनलाईन सट्टा: दोघांवर गुन्हे दाखल, देसाईगंज पोलिसांची कारवाई             गडचिरोली जिल्हा हादरला: जादुटोण्याच्या संशयावरुन दोघांना जीवंत जाळले, १४ जणांना अटक, एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा येथील घटना             ठाणेगाव येथून १८ लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त, तिघे जण ताब्यात: स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई             छत्तीसगडमधील चकमकीत गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत चार नक्षल कमांडर ठार           

आचारसंहितेचा भंग; भाजपच्या दोन नेत्यांवर गुन्हा दाखल

Thursday, 25th April 2024 08:15:56 AM

गडचिरोली,ता.२५: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ.नामदेव किरसान यांच्याविरोधात मजकूर प्रकाशित केल्याप्रकरणी भाजप नेते डॉ.नामेदव उसेंडी आणि डॉ.नितीन कोडवते यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ.नामदेव उसेंडी आणि डॉ.नितीन कोडवते यांनी गडचिरोली येथील कॉम्प्युटर इन्स्टीट्यूटमधून पत्रके छापून त्यात आपली बदनामी करणारा खोटा मजकूर प्रकाशित केला, अशी तक्रार इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ.नामदेव किरसान यांनी केली होती. त्यानुसार डॉ.नामदेव उसेंडी व डॉ.नितीन कोडवते यांच्यावर काल २४ एप्रिलला भादंवि १७(ग)(१), सहकलम लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ च्या कलम १२३(४) चे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान काँग्रेसचे प्रदेश सचिव डॉ.नितीन कोडवते, तसेच आदिवासी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता, हे येथे उल्लेखनीय.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
OQEH3
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना