शुक्रवार, 3 मे 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             आयपीएलवर ऑनलाईन सट्टा: दोघांवर गुन्हे दाखल, देसाईगंज पोलिसांची कारवाई             गडचिरोली जिल्हा हादरला: जादुटोण्याच्या संशयावरुन दोघांना जीवंत जाळले, १४ जणांना अटक, एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा येथील घटना             ठाणेगाव येथून १८ लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त, तिघे जण ताब्यात: स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई             छत्तीसगडमधील चकमकीत गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत चार नक्षल कमांडर ठार           

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान

Sunday, 21st April 2024 05:36:57 AM

गडचिरोली, ता.२१:  शुक्रवारी १९ एप्रिलला झालेल्या गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत ७१.८८ टक्के मतदान झाले आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रे दुर्गम आणि संवेदनशिल भागात असल्याने ईव्हीएम मशिन येण्यास बराच विलंब झाला. आज सर्व यंत्रे पोहचल्यानंतर मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर करण्यात आली.

लोकसभा निवडणुकीत आमगाव विधानसभा मतदारसंघात ६९.२५ टक्के, आरमोरी ७३.६९,गडचिरोली ७१.४२, अहेरी ६६.९३, ब्रम्हपुरी ७५.१० तर चिमूर विधानसभा मतदारसंघात ७४.४१ टक्के मतदान झाले. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात एकूण १६ लाख १७ हजार ७०२ मतदार आहेत. यात ८ लाख १४ हजार ७६३ पुरुष, ८ लाख २ हजार ४३४ महिला आणि १० तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. यापैकी ५ लाख ९५ हजार २७२ पुरुष (७३.०६ टक्के), ५ लाख ६७ हजार १५७ महिला (७०.६८ टक्के)  आणि ५ तृतीयपंथी अशा एकूण ११ लाख ६२ हजार ४३४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ही टक्केवारी ७१.८८ टक्के असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी दिली. २०१९ च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा ०.४५ टक्के मतदान कमी झाले आहे. त्यावेळी ७२.३३ टक्के मतदान झाले होते.

…………………..

  


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
EV6H7
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना