रविवार, 24 जून 2018
लक्षवेधी :
  शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविताना इतर सुविधांची निर्मिती आवश्यक-आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात मुंबई आयआयटीचे प्रा.सतीश अग्नीहोत्री यांचे प्रतिपादन             कुरखेडा तालुक्यातील शिरपूर व अन्य ठिकाणी मामा तलावांच्या दुरुस्तीचे काम निकृष्ट; शासनाच्या उद्देशाची झाली 'माती'! आ.क्रिष्णा गजबे यांनी दिले चौकशीचे निर्देश             वनविभागाच्या लाल झेंडीमुळे सुरजागड लोहखनिज प्रकल्प अडचणीत             जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाचा सहायक लेखाधिकारी एसीबीच्या जाळ्यात-पेंशन केस निकाली काढण्यासाठी निवृत्त महिला कर्मचाऱ्याच्या मुलाकडून स्वीकारली ४ हजार रुपयांची लाच             चंद्रपूर,गडचिरोली व यवतमाळ जिल्हयातील ६ हजार कोटींच्या रस्ते विकास कामांचा मार्ग मोकळा-केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांची माहिती             गडचिरोली येथे कारमेल हायस्कूलच्या मागे नवीन घर विकणे आहे, १६०० स्क्वेअर फूट प्लॉट व १२०० स्क्वेअर फूट बांधकाम-संपर्क ७९७२८८०५१३             नागपूर व गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात फ्लॅटस्, प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ७९७२८८०५१३           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

मुख्यमंत्र्यांनी केला बामणपेठच्या तलाव खोलीकरणाचा शुभारंभ

Friday, 12th May 2017 07:33:18 PM

 

चामोर्शी, ता.१२: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कोनसरी येथील लॉयड मेटल्सच्या लोहप्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरण केल्यानंतर चामोर्शी तालुक्यातील अतिसंवेदनशिल व जंगलव्याप्त बामणपेठ येथील तलावात हेलिकॉप्टर उतरवून माजी मालगुजारी तलावाच्या खोलीकरणाच्या कामाचा शुभारंभ केला.

यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, जिल्हा परिषद सदस्य रूपाली पंदिलवार, सरपंच अनिता अवसरमोल, सामाजिक कार्यकर्ते संजय पंदिलवार, गंगाधर पोटवार, सुशील अवसरमोल उपस्थित होते. मात्र पालकमंत्री, खासदार, आमदार यांच्यापैकी कुणाचेही दर्शन बामणपेठवासीयांना झाले नाही.

यावेळी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्ह्यात सिंचन सुविधा कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली. सिंचनासाठी २३०० विहिरी मंजूर करण्यात आल्या असून, त्यांना वीज उपलब्ध करुन दिल्याचा मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला. मामा तलावामुळे शेती सिंचनास मोठी मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी मामा तलावाची पाहणी करून योग्य दर्जाचे काम करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. याप्रसंगी एका शाळकरी मुलीस मुख्यमंत्र्यांनी प्रश्न विचारले. मात्र, विद्यार्थिनीने समर्पक उत्तरे न दिल्याने दुर्गम भागातील शिक्षण क्षेत्रातील विदारक स्थिती मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आली. यावेळी सरपंच अनिता अवसरमोल यांनी मार्कंडा (कं) ग्रामपंचायत दत्तक घेण्याची विनंती करणारे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले.

जंगलव्याप्त बामणपेठ येथे सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारे आष्टी पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक नीतेश गोहणे यांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
V1A14
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना