शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

दुर्गम भागात आढळली नक्षल्यांची पत्रके

Thursday, 18th September 2014 11:02:04 PM

 
गडचिरोली, ता़१९
येत्या २१ सप्टेंबर रोजी असलेल्या माओवादी कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनादिनाच्या पार्श्वभूमीवर दुर्गम भागात नक्षल्यांनी पत्रके टाकली असून, काही ठिकाणी बॅनरही बांधले आहे़ माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा स्थापना दिवस प्रत्येक गावात साजरा करावा व आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालावा, असे आवाहन नक्षल्यांनी पत्रके व बॅनरद्वारे केले आहे़
कोरची तालुक्यातील दुर्गम भागात तसेच सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर परिसरात नक्षल्यांची पत्रके आढळली़ आज(ता.१९) धानोरा तालुक्यातील मुरुमगाव परिसरात एक बॅनरही आढळले़ त्यात २१ सप्टेंबरला माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा स्थापना दिवस गावागावात साजरा करावा, विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालावा, आॅपरेशन ग्रीनहंट तत्काळ थांबवावे असे आवाहन करण्यात आले आहे़ या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिसांनी सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला आहे़ 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
S414H
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना