शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

गोंडवाना विद्यापीठाला भूमी संपादनाकरिता ८९ कोटी रुपये मंजूर

Thursday, 4th January 2018 06:44:18 AM

गडचिरोली,ता.४ : चंद्रपूर-गडचिरोली या दोन जिल्‍हयांसाठी स्‍थापन करण्‍यात आलेल्‍या गोंडवाना विद्यापीठाच्‍या भूमी संपादनाकरिता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने नुकत्‍याच झालेल्‍या विधीमंडळाच्‍या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्‍यांद्वारे ८९ कोटी ३ लाख रुपये निधीची तरतूद करण्‍यात आली आहे.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या संसदीय संघर्षाच्‍या माध्‍यमातुन २०११ मध्‍ये चंद्रपूर-गडचिरोली या दोन जिल्‍हयांसाठी स्‍वतंत्र गोंडवाना विद्यापीठाची स्‍थापना करण्‍यात आली. या विद्यापीठाच्‍या माध्‍यमातुन उत्‍तम दर्जाचे उच्‍च शिक्षण विद्यार्थ्‍याना मिळावे यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार सातत्‍याने प्रयत्‍नशील आहेत. या विद्यापीठाच्‍या स्‍थापनेमागील उद्दिष्‍ट साध्‍य करण्‍यासाठी उपाययोजना करण्‍याच्‍या दृष्‍टीने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्‍यपाल सी. विद्यासागर राव यांच्‍याकडेसुध्‍दा पाठपुरावा केला. २०१६ मध्‍ये राज्‍यपालांनी यासंबंधीचा अभ्‍यास करण्‍यासाठी ऑब्‍जर्व्‍हर रिसर्च फाऊंडेशनची नियुक्‍ती केली होती. 

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या विद्यापीठाला जागतिक दर्जाचे विद्यापीठ बनविण्‍यासाठी कोणकोणत्‍या उत्‍तम कल्‍पना राबविता येऊ शकतील, हे विचारात घेऊन विद्यापीठाचा दृष्‍टीकोन व त्‍याची भविष्‍यातील वाटचाल दर्शविणारा सखोल अभ्‍यास करून यासंबंधीचा अहवाल सादर करण्‍यास फाऊंडेशनचे अध्‍यक्ष सुधींद्र कुलकर्णी यांना सांगितले होते. फाऊंडेशनने काही महिन्‍यांपूर्वी आपला अहवाल शासनाला सादर केला. गोंडवाना विद्यापीठाची सद्यःस्थिती, विद्यापीठाची जागा, तेथील विद्यार्थ्‍यांच्‍या गरजा, आदिवासीबहुल लोकसंख्‍या, त्‍यांच्‍यासाठी पदवी आणि पदव्‍युत्‍तर शिक्षणाच्‍या सुविधा, कौशल्‍यविकास, भौगोलिक अंतरामुळे निर्माण होणा-या समस्‍या या सर्व गोष्‍टींचा साकल्‍याने विचार करून या अं‍तरिम अहवालात विविध शिफारसी करण्‍यात आल्‍या आहेत.

ऑब्‍जर्व्‍हर रिसर्च फाऊंडेशनच्‍या शिफारसीच्‍या अनुषंगाने शासनाने कार्यवाही सुरू केली असून, भूमी संपादनाकरिता पुरवणी मागण्‍यांद्वारे ८९ कोटी ३ लाख रुपये. एवढी तरतूद करण्‍यात आली असुन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने गोंडवाना विद्यापीठ सक्षम व उत्‍तम दर्जाचे विद्यापीठ होण्‍याच्‍या प्रक्रियेला चालना मिळाली आहे.

 

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
Q41NR
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना