शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

गीताचार्य तुकारामदादांचे उत्तराधिकारी लक्ष्मणदादा नारखेडे यांचे निधन

Sunday, 8th April 2018 06:05:24 AM

गडचिरोली, ता.८: गीताचार्य तुकारामदादा यांचे अड्याळ (टेकडी) येथील उत्तराधिकारी व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्याला वाहून घेतलेले लक्ष्मणदादा नारखेडे यांचे आज दुपारी पावणेदोन वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. सोमवारी(ता.९)अड्याळ टेकडी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. 

मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील रहिवासी असलेले लक्ष्मणदादा नारखेडे यांनी ऐन तारुण्यातच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्याला वाहून घेतले होते. अत्यंत साधी राहणी, प्रेमळ व मृदुभाषी व्यक्तिमत्वाचे धनी म्हणून ओळखले जाणाऱ्या लक्ष्मणदादांना गीताचार्य तुकारामदादांच्या निधनानंतर अड्याळ टेकडीचे उत्तराधिकारी म्हणून नेमण्यात आले होते.

मागील १५ दिवसांपासून ते मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त होते. आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
00EFU
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना