मंगळवार, 19 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाचा सहायक लेखाधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Thursday, 21st June 2018 06:30:39 AM

गडचिरोली, ता.२१: एका निवृत्त महिला कर्मचाऱ्याची पेंशन केस मंजूर करण्यासाठी तिच्या मुलाकडून ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गडचिरोली जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील सहायक लेखाधिकारी रवींद्र नीळकंठ देवतळे(५०) यास रंगेहाथ पकडून अटक केली.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्ता हा गुजरात राज्यात मजुरीचे काम करतो. त्याची आई समाजकल्याण विभागात कर्मचारी होती. प्रकृती बरी राहत नसल्याने तिने स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर तिने पेंशन केस मंजूर करण्यासाठी आपल्या विभागाकडे अर्ज केला. परंतु केस वरिष्ठांकडे सादर करुन त्यावर स्वाक्षरी घेऊन ती मंजूर करण्याकरिता सहायक लेखाधिकारी रवींद्र देवतळे याने तक्रारकर्त्यास ५ हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती तो ४ हजार रुपये स्वीकारण्यास तयार झाला. मात्र, लाच देण्याची तक्रारकर्त्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार केली. त्यानुसार या विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज जिल्हा परिषदेसमोरील एका हॉटेलात सापळा रचला. यावेळी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रवींद्र देवतळे यास तक्रारकर्त्याकडून ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७, १३(१)(ड), सहकलम १३(२) अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली.

 

एसीबीचे पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलिस अधीक्षक राजेंद्र नागरे, पोलिस उपअधीक्षक विजय माहुलकर, पोलिस उपअधीक्षक डी.एम.घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एम.एस.टेकाम, सहायक फौजदार मोरेश्वर लाकडे, हवालदार सत्यम लोहंबरे, रवींद्र कत्रोजवार, सतीश कत्तीवार, महेश कुकुडकार, गणेश वासेकर, सोनल आत्राम, तुळशीदास नवघरे, घनश्याम वडेट्टीवार यांनी ही कारवाई केली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
2100R
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना