शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

गडचिरोली जिल्ह्याच्या निर्मितीत बाबूराव मडावी यांचे मोठे योगदान: फरेंद्र कुतीरकर

Thursday, 17th June 2021 01:01:01 AM

गडचिरोली,ता.१७: गडचिरोली जिल्ह्याच्या निर्मितीसह आदिवासी समाजाच्या उत्थानात दिवंगत बाबूराव मडावी यांचे योगदान मोठे आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी फरेंद्र कुतीरकर यांनी केले.

आदिवासी समाजातर्फे माजी मंत्री दिवंगत बाबूराव मडावी यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. फरेंद्र कुतीरकर म्हणाले की, बाबूराव मडावी मंत्री असताना त्यांच्या प्रयत्नामुळेच स्वतंत्र गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली. त्यामुळे तेच या जिल्ह्याच्या निर्मितीचे शिल्पकार आहेत. शिवाय बाबूराव मडावी यांनी केलेल्या कार्यामुळे आदिवासी समाजाच्या प्रगतीचा मार्ग मोकळा झाला. बाबूराव मडावी यांचे योगदान लक्षात घेता गडचिरोली शहरात त्यांचा पुतळा उभारावा, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

यावेळी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती रंजिता कोडापे, नगरसेवक गुलाब मडावी, नगरसेविका रंजना गेडाम, आदिवासी सेवक घनश्याम मडावी, जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष भरत येरमे, कवयित्री कुसुम आलाम, कैलास मडावी, सदानंद ताराम, आनंद कंगाले, प्रदीप कुलसंगे, वर्षा शेडमाके, उत्तम गेडाम, राजीवशहा मसराम, रोहिणी मसराम, सुखदेव वेठे, ऋषी होळी, ऋषी कुळमेथे, मुकुंदा सिडाम, वनिशाम येरमे, दिलीप शेडमाके, डंबाजी पेंदाम, श्रीनिवास कोडाप, नीतेश मडावी, सुधीर मसराम, देवराव आलाम, विनायक कोडापे, राजेश्वर पदा उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन अमरसिंह गेडाम व देवराव आलाम, तर आभार प्रदर्शन विनायक कोडाप यांनी केले.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
SYW25
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना