शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

गडचिरोली जिल्ह्यातील १७२ ग्रामपंचायतीमधील ३५१ पदांसाठी २१ डिसेंबरला पोटनिवडणूक

Monday, 22nd November 2021 06:42:35 AM

गडचिरोली,ता.२२: राज्य निवडणूक आयोगाने आज गडचिरोली जिल्ह्यातील १७२ ग्रामपंचायतींमधील ३५१ जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, २१ डिसेंबला मतदान होणार आहे. या जागा विविध कारणांमुळे रिक्त झाल्या आहेत.

निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र सादर करण्याचा कालावधी ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबरपर्यंत आहे. ७ डिसेंबरला नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येईल, तर ९ डिसेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. याच दिवशी दुपारी ३ वाजतानंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल. २१ डिसेंबरला सकाळी साडेसात ते दुपारी ३ वाजतापर्यंत निवडणूक होणार असून, २२ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून निवडणूक प्रक्रियेस सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी केले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
VOE7R
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना