/* */
रविवार, 26 मार्च 2023
लक्षवेधी :
   पोलिसांनी हुडकून काढली नक्षल्यांनी पुरुन ठेवलेली स्फोटके: भामगरा तालुक्यातील नेलगुंडा येथील घटना             अहेरी तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के: तेलंगणातील कागजनगरनजीकच्या दहेगावजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू           

वीज कोसळून शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू

Saturday, 18th March 2023 06:30:40 AM

गडचिरोली,ता.१८: शाळा सुटल्यानंतर गावाकडे जाणाऱ्या विद्यार्थिनीचा वीज कोसळून मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास चामोर्शी तालुक्यातील माल्लेर चक या गावाजवळ घडली. स्वीटी बंडू सोमनकर(१५) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून, ती माल्लेर चक येथील रहिवासी होती.

स्वीटी ही कुनघाडा येथील विश्वशांती विद्यालयात नवव्या वर्गात शिकत होती. सकाळी शाळा सुटल्यानंतर ती सायकलने आपल्या मैत्रिणींसह गावाकडे जात असताना मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरु झाला. एवढ्यात अंगावर वीज कोसळल्याने स्वीटी गंभीर जखमी झाली. कुनघाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार केल्यानंतर तिला गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पावसामुळे जनजीवन विस्कळीत

आज सकाळी आणि दुपारी गडचिरोलीसह जिल्हृयाच्या अन्य भागात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडला. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. मात्र, दुपारनंतर पावसाने उसंत घेतली. तरीही वातावरणात गारवा आहे. पावसामुळे रबी पिकाचे नुकसान होण्याची भीती व्यकत करण्यात येत आहे.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
YC8S4
  © 2014 - 2023 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना