शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

जेसा मोटवानी, अशोक माडावार यांच्यावर गुन्हे दाखल

Friday, 25th July 2014 11:46:16 AM

प्रकरण मारहाणीचे

गडचिरोली, ता.25 : शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी देसाईगंज नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी यांच्यावर कलम 353 अन्वये गुन्हा दाखल केला आहे़. याशिवाय मोटवानी यांच्या तक्रारीवरून आरोग्य लिपिक अशोक माडावार यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. काल 24 जुलै रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी व नगर परिषदेचे आरोग्य लिपिक अशोक माडावार हे मुख्याधिका-यांच्या कक्षात बसले असता दोघांमध्ये हाणामारी झाली. त्यानंतर दोघांनीही एकमेकांविरूद्ध पोलिसांत तक्रार केली. पुढे दोघांचे बयाण नोंदविल्यानंतर पोलिसांनी जेसा मोटवानी यांच्याविरूद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कलम 353 अन्वये गुन्हा दाखल केला आहे़. दुसरीकडे, जेसा मोटवानी यांच्या तक्रारीवरून अशोक माडावार यांच्याविरूद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी सांगितले़


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
RKD4I
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना