/* */
सोमवार, 29 मे 2023
लक्षवेधी :
  गण्यारपवार मारहाण प्रकरण: गावात येऊन बयाण घेण्याची साक्षदारांची मागणी             थेट बंगल्यावर जाऊन न्यायाधीशांना धमकावल्याप्रकरणी चामोर्शीचे पोलिस निरीक्षक राजेश खांडवे निलंबित             चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अतुल गण्यारपवार यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्याचे प्रथमवर्ग न्यायालयाचे आदेश             चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘गोंडवानाचा महायोध्दा-क्रांतिवीर बाबूराव शेडमाके’ या नाट्यपुस्तकाचे २८ ला प्रकाशन              गडचिरोली जिल्ह्यातील तीन एसडीपीओंच्या बदल्या, पिपंरी चिंचवडचे सहआयुक्त प्रशांत अमृतकर गडचिरोलीचे नवे एसडीपीओ           

कविता : नैसर्गिक आपदा

Tuesday, 5th August 2014 05:46:27 AM

II नैसर्गिक आपदा II
 
 
 
पाऊस धो धो पडला 
 
डोंगर तो धसला 
 
भसा भस कोसळला 
 
चिखल खाली वाहला II१II
 
 
 
गाढ होते सगळे  
 
गाव ते हो झोपले 
 
घास करुनी गावाचा 
 
भूमीने तो गिळला II२II
 
 
 
माळीण गांव भूमीत 
 
गेले कसे ते गाडले ?
 
फक्त नाव शिल्लक  
 
सारे भूमीत संपले II३II
 
 
 
निसर्गाचा कोप हा 
 
गावावर जाहला 
 
शेकड्यावरी मृतांचा 
 
आकडा तो पोचला II४II
 
 
 
किती रे तोडशील 
 
वृक्ष झाडे संपदा ?
 
किती रे सोसशील   
 
नैसर्गिक आपदा II५II
 
 
 
संसार होता थाटला  
 
दैवाने हा उधळला 
 
जीवनाचा डाव हा 
 
क्षणात काही संपला II६II
 
 
 
महाभूताने क्षणात  
 
कार्यभाग साधला 
 
पाहुनी ते दृश्य सारे 
 
जमाव सुन्न जाहला II७II
 
 
 
दुःखाचा रंग हा    
 
आसमंती दाटला 
 
जन सागर इथे हा
 
मदतीस धावला  II८II
 
 
 
प्रगतीच्या ह्या भरात 
 
माणूस का विसरतो ? 
 
निसर्गास नित्य आपण 
 
किती किती शोषतो II९II
 
 
 
माणसाचा जीव आज 
 
किती क्षुद्र जाहला 
 
मदतीचा आकडा तो 
 
काही लाखात मोजला II१०II
 
 
 
लेखक / कवी - सुरेश पित्रे.
 
पत्ता- " वैद्य सदन ", पहिला मजला, राघोबा शंकर रोड, 
 
चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. - ४००६०१
 
भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९           
 
Email ID - kharichavata@gmail.com


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
YMP9J
  © 2014 - 2023 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना