शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

वैरागडच्या वीज कार्यालयात चोरी, महावितरणला शॉक!

Saturday, 20th September 2014 05:25:55 AM

 
गडचिरोली, ता, २० 
आरमोरी तालुक्यातील वैरागड येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात अज्ञात चोरट्यांनी कार्यालयातील दोन दरवाज्यांचे कुलूप तोडून विद्युत साहित्याची चोरी केल्याची घटना २० सप्टेंबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास घडली. आज सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास कर्मचारी कार्यालयात आले असता चोरी झाल्याचे लक्षात आले. 
वैरागड येथील वीज वितरण कंपनीच्या वसाहतीमध्ये असलेल्या विद्युत कार्यालयात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला़ त्यानंतर त्यांनी कार्यालयाच्या समोरील दरवाजाचे कुलूप फोडले़ त्यानंतर बाजूलाच असलेल्या विद्युत अभियंत्याच्या खोलीतील संगणक आणि इतर विद्युत साहित्य अस्ताव्यस्त फे कून खोलीतील कपाट फोडले़ तेथील ३ पट्टयाा, १२ फ्यूज वायर, ३ टार्च, साधे नट खोलण्याचे पाने २ सेट, नट खोलण्याचे रिंग पाने १ सेट, ७ पेंचिस एवढे साहित्य चोरून नेले. यामुळे महावितरण कंपनीचे १६ हजार २८० रुपयांचे नुकसान झाले आहे.  

आज सकाळी साडेनऊ वाजता विद्युत तंत्रज्ञ विलास पाटील कार्यालयात आले असता कार्यालयातील साहित्य चोरी गेल्याचे दिसून आले. श्री. पाटील यांनी तत्काळ अभियंता मून यांना घटनेबाबत माहिती दिली. अभियंता मून यांनी घटनेची माहिती आरमोरी पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक महेंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक एन.बी. बच्चलवार, सहायक फौजदार प्रल्हाद उंदिरवाडे, देवराव सहारे, पोलिस पाटील गोरख भानारकर यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
PAEJM
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना