मंगळवार, 16 जानेवारी 2018
लक्षवेधी :
   धानोऱ्यात एकाच रात्री सहा ठिकाणी घरफोड्या, नागरिक भयभीत             सरकारी स्वस्त धान्य दुकानातील धान्याची अफरातफर, देसाईगंज पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हे दाखल             पतंगाच्या मांजामुळे दोघे जण जखमी-गडचिरोलीतील घटना           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : गडचिरोली जिल्हयातील गैरआदिवासींच्या प्रश्नांकडे राज्य सरकार डोळेझाक करीत आहे, असे वाटते काय?
होय :
77%
नाही :
23%

डॉ.प्रकाश व डॉ.मंदाकिनी आमटे यांना लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड जाहीर

Tuesday, 12th December 2017 06:26:11 AM

गडचिरोली, ता.१२: रमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित सुप्रसिद्ध समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे व डॉ.मंदाकिनी आमटे यांना 'देशम' संस्थेतर्फे आयोजित तिसऱ्या कोलकाता इंटरनॅशनल वाईल्डलाईफ एन्व्हार्नमेंट फिल्म फेस्टीवलनिमित्त लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड जाहीर झाला आहे.

फेस्टीवलचे डायरेक्टर आदित्य मुखर्जी यांनी डॉ.प्रकाश व डॉ.मंदाकिनी आमटे यांना पत्र पाठवून पुरस्कार स्वीकारण्याचे निमंत्रण दिले आहे. यंदाचे तिसरे कोलकाता इंटरनॅशनल वाईल्डलाईफ एन्व्हार्नमेंट फिल्म फेस्टीवल १५ ते १७ डिसेंबर रोजी कोलकाता येथे आयोजित करण्यात आले आहे. या फेस्टीवलसाठी ११६ देशांमधून सुमारे २३०० चित्रपटांचे नामांकन आले आहे. यानिमित्त समारोह समिती 'पर्यावरण व वन्यजीव' या विषयावर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जगभरातील निवडक तज्ज्ञांना 'गोल्डन टायगर' पुरस्कारानेही सन्मानित करणार आहे. तसेच डॉ.प्रकाश व डॉ.मंदाकिनी आमटे यांना लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्डने गौरवान्वित केले जाणार आहे. फिल्म फेस्टीवलमध्ये मान्यवरांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात आमटे दाम्पत्याची 'मीट द प्रेस' होणार आहे. यापूर्वी सुप्रसिद्ध हत्तीतज्ज्ञ पार्बती बरुआ, बेलिंद्र राईट, पामेला गेल यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

कालच डॉ.प्रकाश आमटे यांची सेंट्रल अॅनिमल वेल्फेअर बोर्डाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आता त्यात नव्या पुरस्काराची भर पडल्याने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
NOUME
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना