शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

एसडीपीओ कार्यालयातील जवानावर युवकांचा जीवघेणा हल्ला

Monday, 18th December 2017 07:06:35 AM

कुरखेडा, ता.१८: येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या अधिनस्थ विशेष जलद पथकातील जवानावर तीन युवकांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना काल(ता.१७) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली. उमाजी हलामी, असे जखमी जवानाचे नाव आहे. हल्लेखोरांविरुद्ध कुरखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमाजी हलामी यांना गोपनीय माहिती मिळाल्याने ते संबंधित कर्तव्यावर मोटारसायकलने जात होते. वाटेत सुसाट वेगाने ओव्हरटेक करणाऱ्या युवकास त्यांनी हटकले. यावेळी मोटारसायकलवर असलेल्या युवकांनी उमाजी हलामी यांना शिवीगाळ करुन पानठेल्यातील लाकडी फळीने त्यांच्या डोक्यावर प्रहार केला. श्री.हलामी यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना गडचिरोलीला हलविण्यात आले. हलामी यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी समीर शेख, आफताब मोहम्मद अली शेख व अन्य एका युवकाविरुद्ध भादंवि कलम ३५३,३३२, २९४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आरोपी फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिस उपनिरीक्षक चौधरी घटनेचा तपास करीत आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
G0F14
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना