मंगळवार, 16 जानेवारी 2018
लक्षवेधी :
   धानोऱ्यात एकाच रात्री सहा ठिकाणी घरफोड्या, नागरिक भयभीत             सरकारी स्वस्त धान्य दुकानातील धान्याची अफरातफर, देसाईगंज पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हे दाखल             पतंगाच्या मांजामुळे दोघे जण जखमी-गडचिरोलीतील घटना           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : गडचिरोली जिल्हयातील गैरआदिवासींच्या प्रश्नांकडे राज्य सरकार डोळेझाक करीत आहे, असे वाटते काय?
होय :
77%
नाही :
23%

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास ६ वर्षांचा कारावास

Tuesday, 2nd January 2018 09:10:06 PM

गडचिरोली, ता.३: अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीस येथील विशेष सत्र न्यायालयाने ६ वर्षांचा कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. पवित्र उर्फ शशांक परिमल सरकार रा.कालीनगर, ता.मुलचेरा असे दोषी इसमाचे नाव आहे.

४ फेब्रुवारी २०१६ च्या संध्याकाळी पीडित मुलगी शाळेतून घरी परत आल्यानंतर ती आपल्या बहिणीच्या घराकडे जात होती. एवढ्यात शशांकने तिचा कुरकुऱ्याचे पॉकिट देण्याचे आमिष दाखवून मोटारसायकलवर बसविले. नंतर तो तिला गांधीनगर रस्त्यावरील जंगलात घेऊन गेला आणि तिच्या लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. एवढ्यात एक इसम सायकलने येताच आरोपी शशांक हा पळून गेला. पीडित मुलीच्या आईने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आरोपी शशांक सरकार यास अटक केली. पोलिस उपनिरीक्षक संदीप कापडे यांनी तपास पूर्ण करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. काल(ता.२)या प्रकरणाचा निकाल लागला. विशेष सत्र न्यायालयाने सर्व साक्षदारांचे बयाण नोंदवून व सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य मानून आरोपी शशांक सरकार यास ६ वर्षांचा सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल प्रधान यांनी काम पाहिले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
86J3N
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना