शनिवार, 10 एप्रिल 2021
लक्षवेधी :
  प्रेयसीला विहिरीत ढकलून तिची हत्या करणाऱ्या प्रियकरास जन्मठेपेची शिक्षा-गडचिरोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचा निवाडा             ७ एप्रिल कोरोना अपडेट:गडचिरोली जिल्हयात कोरोनामुळे चार जणांचा मृत्यूं, १८५ नवे बाधित             नगराध्यक्ष योगिता पिपरे यांना अपात्र करण्याविषयीच्या तक्रारीवर ८ एप्रिलला सुनावणी             जाहिरात: गडचिरोली शहरात आरमोरी रोडवर प्रशस्त घर विकणे आहे. संपर्क साधा ९४०५१४३६७०           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

नगराध्यक्ष योगिता पिपरे यांना अपात्र करण्याविषयीच्या तक्रारीवर ८ एप्रिलला सुनावणी

Wednesday, 7th April 2021 07:49:09 AM

गडचिरोली,ता.७: येथील नगर परिषदेच्या अध्यक्ष योगिता पिपरे यांना अपात्र करण्याविषयी सत्ताधारी भाजपच्या १५ नगरसेवकांनी नगर विकास मंत्रालयाकडे केलेल्या तक्रारीवर ८ एप्रिलला सुनावणी घेण्यात येणार आहे.

डिेसेंबर २०१६ मध्ये झालेल्या गडचिरोलीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या योगिता पिपरे विजयी झाल्या होत्या. शिवाय भाजपचे सर्वाधिक सदस्यही निवडून आल्याने नगर परिषदेवर भाजपची निर्विवाद सत्ता प्रस्थापित झाली. परंतु हळूहळू नगराध्यक्ष आणि सत्ताधारी पक्षांतील नगरसेवकांमध्ये विविध कारणांवरुन वितुष्ट निर्माण झाले. सुरुवातीला पेल्यातील वादळ म्हणून पक्षनेत्यांनी वाद मिटविण्याचा प्रयत्न्‍ केला. परंतु त्यांना यश आले नाही. शेवटी २२ मे २०२० रोजी तत्कालिन बांधकाम सभापती आनंद शृंगारपवार व अन्य १४ नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करुन नगराध्यक्ष योगिता पिपरे यांना अपात्र घोषित करावे, अशी मागणी केली. योगिता पिपरे या पदाचा गैरवापर करुन बेकायदेशिररित्या ठराव मंजूर करवून घेत आहेत, तसेच भाड्याचे वाहन वापरुन ११ लाख ६१ हजार ९१४ रुपयांची उचल केली आहे. हे नियमबाह्य असल्याने त्यांना अपात्र घोषित करावे, अशी मागणी नगरसेवकांनी तक्रारीत केली होती.

त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून योगिता पिपरे यांना अपात्र करण्याविषयीचा अहवाल नगरविकास मंत्रालयाकडे पाठविला होता. पुढे अनेकदा पाठपुरावा केल्यानंतरही नगरविकास मंत्रालयाने निर्णय न दिल्याने नगरसेवकांत तीव्र नाराजी निर्माण झाली होती. अखेर ८ एप्रिलला यावर सुनावणी घेण्याचे निश्चित झाले आहे. नगर विकास मंत्रालयाचे कार्यासन अधिकारी प्रवीण पाटील यांनी हे पत्र जारी केले आहे. गुरुवारी ८ एप्रिलला दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात व्हीडीओ कॉन्फरंसिंगद्वारे ही सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
8K90G
  © 2014 - 2021 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना