/* */
रविवार, 22 मे 2022
लक्षवेधी :
  वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दुर्योधन तरारे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश             कमलापूचे हत्ती जामनगरला नेण्याच्या विरोधात काँग्रेसचे ठिय्या आंदोलन, तर भाजपने केला चक्काजाम             गडचिरोली येथे आरमोरी रोड आणि कारमेल हायस्कूलच्या मागे दोन प्रशस्त घरे विकावयाची आहेत: संपर्क: ९४०५१४३६७०           

ग्राम स्वच्छता अभियानात पारडी ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय विशेष पुरस्कार

Thursday, 1st July 2021 06:18:06 AM

गडचिरोली,ता.१: राज्यस्तरीय संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा २०१७-१८ मध्ये गडचिरोली तालुक्यातील पारडी(कुपी) ग्रामपंचायतीला विशेष पुरस्कार मिळाला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऑनलाईन उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात जिल्हाधिकारी दीपक सिंगला व मुख्य कार्यपालन अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते सरपंच संजय निखारे, सचिव किशोर कुळसंगे, गटविकास अधिकारी, मुकेश माहोर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. स्व. आबासाहेब खेडकर स्मृती पुरस्कार या नावाने हा पुरस्कार देण्यात येतो. प्रशस्तिपत्र व ३ लाख रुपयांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

पारडीकुपी ग्रामपंचायतीने गावातील स्वच्छता, हागणदारी मुक्ती, जलसंधारण अशा विविध विषयात विविध  पुरस्कार पटकावले आहेत. तसेच गावाने स्मार्ट व्हिलेज पुरस्कारही प्राप्त केला आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जिल्ह्यात प्रथम आल्यानंतर नागपूर विभागात द्वितीय क्रमांक पटकावला तर आता राज्यस्तरावर विशेष पुरस्कार पटकविण्यात यश मिळविले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
41G4D
  © 2014 - 2022 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना