/* */
सोमवार, 8 ऑगस्ट 2022
लक्षवेधी :
  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: कोरचीत १७ पैकी १३ प्रभारी अधिकारी करणार ध्वजारोहण             महागाईच्या विरोधात केंद्र सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसची गडचिरोलीत रॅली             चामोर्शी पंचायत समितीतील आरोग्य सेवक एसीबीच्या जाळ्यात: कोतवाल पंजी प्रमाणपत्र बनवून देण्यासाठी इसमाकडून स्वीकारली साडेतीन हजार रुपयांची लाच             सिरोंचा तालुक्यातील पूरग्रस्त भागाची केंद्रीय पथकाकडून पाहणी             निकृष्ट तांदूळ प्रकरण: अहवाल न दिल्याने राज्य शासनाने डीएसओला खडसावले             गडचिरोली येथे आरमोरी रोड आणि कारमेल हायस्कूलच्या मागे दोन प्रशस्त घरे विकावयाची आहेत: संपर्क: ९४०५१४३६७०           

पोलिस हवालदाराच्या हत्येप्रकरणी पत्नी, मुलगी आणि युवकास अटक

Saturday, 17th July 2021 06:45:07 AM

गडचिरोली,ता.१७: अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथील पोलिस हवालदार जगन्नाथ सिडाम यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आज मृत हवालदाराची पत्नी ललीता सिडाम, मुलगी रोहिणी सिडामव इंद्रजित खोब्रागडे नामक युवकास अटक केली आहे.  

हवालदार जगन्नाथ सिडाम(५३) हे भामरागड तालुक्यातील धोडराज पोलिस मदत केंद्रात कार्यरत होते. त्यांचे कुटुंबीय अहेरीनजीकच्या नागेपल्ली येथील वॉर्ड क्रमांक दोनमध्ये वास्तव्य करीत होते. ४ जुलैला जगन्नाथ सिडाम हे आपल्या घरी झोपेत असताना एका इसमाने दार ठोठावला. त्यानंतर काही कळायच्या आत त्याने सिडाम यांचा गळा कापून खून केला.

पोलिसांनी तपासाअंती आज जगन्नाथ सिडाम यांची पत्नी, मुलगी व एटापल्ली तालुक्यातील गट्टा(जांभिया) येथील इंद्रजित खोब्रागडे यास अटक केली. अहेरीच्या न्यायालयाने त्यांना १९ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पत्नी व मुलीने इंद्रजित खोब्रागडे यास सुपारी देऊन जगन्नाथ सिडाम यांची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अहेरी पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
H6U4A
  © 2014 - 2022 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना