शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

ई-पीक पाहणीच्या कामास १४ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

Thursday, 30th September 2021 06:16:36 AM

गडचिरोली,ता.३०: राज्य शासनाने ई-पीक पाहणीच्या कामाला १४ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या प्रचार, प्रसिद्धी व प्रबोधनसाठी १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट आणि खरीप हंगामाच्या प्रत्यक्ष मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी १५ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर असा कालावधी निश्चित करुन देण्यात आला होता. त्यानंतर ३० सप्टेंबरपासून तलाठी स्तरावरुन होणारी पीक पाहणी करण्याचे व ई-पीक पाहणी मंजूर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु राज्याच्या काही भागात अतिवृष्टी, पूर, कोरोना महामारी व उशिराच्या मान्सूनमुळे ई-पीक पाहणीच्या कामास मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यस्तरीय अंमलबजावणी समितीच्या ३० सप्टेंबर २०२१ च्या बैठकीत ई-पीक पाहणीच्या शेतकरी स्तरावरील कामाला १४ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.

तथापि, तलाठी स्तरावरील पीक पाहणीला मान्यता देण्यास सुरुवात करावी, असे निर्देश सर्व तलाठ्यांना देण्यात आल्याची माहिती ई-पीक पाहणी प्रकल्पाचे राज्य समन्वयक, उपजिल्हाधिकारी तथा जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे यांनी दिली आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
6UA0K
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना