शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

गडचिरोलीत नळाच्या पाण्यात मांसाचे तुकडे

Tuesday, 14th June 2022 07:05:53 AM

गडचिरोली,ता.१४: येथील नगर परिषदेद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या नळाच्या पाण्यात चक्क मांसाचे तुकडे आल्याने खळबळ माजली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

१० जून रोजी विवेकानंदनगरातील योगेश देवोजवार नामक युवकाने पाण्याच्या टाकीत उडी मारुन आत्महत्या केली. त्याचा मृतदेह चक्क शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपमध्ये अडकला होता. नगर परिषद कर्मचाऱ्यांनी मृतदेह बाहेर काढल्यानंतर दोन दिवस पाणीपुरवठा बंद होता. आज पाणीपुरवठा सुरु होताच सकाळी चामोर्शी मार्गावरील वीर बाबूराव शेडमाके चौकातील मुन्ना आत्राम यांच्या घरच्या नळाच्या पाण्यात चक्क मांसाचे तुकडे आढळून आले.

त्यानंतर काही पत्रकार आणि नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांकडे जाऊन विचारणा केली. मात्र, त्यांच्या उत्तराने नागरिकांचे समाधान झाले नाही. योगेश देवोजवारचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पाईपलाईनमध्ये अडकून होता. त्यामुळे पाण्याची टाकी आणि पाईपचे निर्जंतुकीकरण होणे गरजेचे होते. परंतु आज चक्क मांसाचे तुकडे आढळल्याने टाकी आणि पाईपची योग्यप्रकारे स्वच्छता झाली नसल्याचे दिसून आले. नगर परिषदेच्या या अक्षम्य दिरंगाईबद्दल नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
ULLUA
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना