शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

गडचिरोली जिल्हा परिषदेच्या कॅफोला विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक

Monday, 21st November 2022 09:36:21 AM

गडचिरोली, ता. २१: अधिनस्त कर्मचारी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी आज संध्याकाळी उशिरा जिल्हा परिषदेचा मुख्य लेखा व वित्त अधिकारी ओंकार अंबपकर(५४) यास अटक केली. अंबपकर हा कोल्हापूर जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहे.

ओंकार अंबपकर हा पीडित कर्मचारी महिलेला बरेचदा आपल्या कक्षात बोलावून तिच्याशी असभ्य वर्तन करीत होता. सोमवारी (ता.२०) अंबपकर याने तिला आपल्या कक्षात बोलावून एका प्रस्तावातील आकडेवारी वाचून दाखविण्यास सांगितले. त्यानंतर तिचा विनयभंग केला. पीडित महिलेने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी ओंकार अंबपकर यास विनयभंग आणि अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये अटक केली. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणिल गिल्डा घटनेचा तपास करीत आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
UAJ5U
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना