/* */
रविवार, 26 मार्च 2023
लक्षवेधी :
   पोलिसांनी हुडकून काढली नक्षल्यांनी पुरुन ठेवलेली स्फोटके: भामगरा तालुक्यातील नेलगुंडा येथील घटना             अहेरी तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के: तेलंगणातील कागजनगरनजीकच्या दहेगावजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू           

गडचिरोली जिल्ह्यातील हजारो कर्मचारी संपावर, कामकाज ठप्प

Tuesday, 14th March 2023 06:15:05 AM

गडचिरोली, ता. १४: जुनी पेंशन लागू करण्याच्या मागणीसह अन्य मागण्यांसाठी आजपासून कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपाला गडचिरोली जिल्ह्यात उदंड प्रतिसाद मिळाला. 

एनपीएस रद्द करुन जुनी पेंशन योजना लागू करावी, कंत्राटी, अंशकालीन, रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित कराव्या, सर्व रिक्त पदे तत्काळ भरावी, कामगार कायद्‌यातील बदल केलेल्या जाचक अटी रद्‌द कराव्या, चतुर्थ श्रेणी व वाहनचालकांची पदे भरण्यावरील बंदी उठवावी, शिक्षक व शिक्षकेतर, पालिका कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मंजूर कराव्या, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या विनाशर्त कराव्या अशा विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, शिक्षक संघटना शिवाय महसुल, वने, कृषी, आरोग्य, पोलिस, वाहनचालक, पेसा समन्वयक, रोहयो कर्मचारी  अशा ४० हून अधिक संघटनांनी हा संप पुकारला असून १० हजारांहून अधिक कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. यामुळे शासकीय कार्यालये आणि शाळांमध्ये शुकशुकाट दिसून आला. कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच तालुकाळी निदर्शने केली

  


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
04N3V
  © 2014 - 2023 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना