सोमवार, 29 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आयपीएलवर ऑनलाईन सट्टा: दहा जणांना अटक, अहेरी पोलिसांची कारवाई             रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत           

गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड

Monday, 15th April 2024 06:56:04 AM

गडचिरोली,ता.१५:लोकसभा निवडणूक काळात गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी नेमण्यात आलेल्या तपासणी पथकाने काल रात्री दोन प्रकरणात ११ लाख १०० रुपयांची रोकड जप्त केली आहे.

जिल्ह्यात १६ मार्चपासून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. या कालावधीत गैरप्रकार रोखण्यासाठी व्हिडीओ सर्वेक्षण पथक, भरारी पथक, स्थिर सर्वेक्षण पथक इत्यादी पथकांद्वारे विविध ठिकाणी तपासणी करण्यात येत आहे. 

काल १४ एप्रिल रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास शासकीय विज्ञान महाविद्यालयानजीकच्या महादेव मंदिरासमोर भरारी पथकाने नाकाबंदी केली होती. एवढ्यात एक पांढऱ्या रंगाची हुंदाई कार येताना दिसली. या कारची तपासणी केली असता त्यात एका बॅगेत १० लाख १०० रुपये आढळून आले. याबाबत वाहनचालकाला विचारणा केली असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यानंतर पोलिस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या निर्देशानुसार भरारी पथकप्रमुख खेमराज लेगनुरे यांनी ती रक्क्‍म जप्त केली.  .

त्यानंतर काही वेळाने एक पांढऱ्या रंगाची फोर्ड कंपनीची कार येताना दिसली. या कारच्या समोरच्या डिक्कीत एक लाख रुपये आढळून आले. ही रक्कम घराच्या बांधकामाकरिता भावाकडून आणल्याचे चालकाने सांगितले. परंतु या रकमेबाबत खात्री करण्यासाठी भरारी पथकाने ती रक्कम जप्त करून आर्थिक उलाढालीचे कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना दिल्या.

या दोन्ही प्रकरणात तपास सुरु असल्याची माहिती आदर्श आचारसंहिता समितीचे नोडल अधिकारी तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांनी दिली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
530ZD
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना