शनिवार, 27 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

नक्षल्यांनी केली युवकाची हत्या

Friday, 9th October 2015 05:24:51 AM

 

भामरागड, ता.९: पोलिसांना माहिती देत असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी एका युवकाची गळा चिरुन हत्या केल्याची घटना काल(ता.८) रात्री मलमपोडूर येथे घडली. शंकर वड्डे(२५) असे मृत युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ ऑक्टोबर रोजी सशस्त्र नक्षल्यांनी शंकरचे अपहरण केले होते. त्यानंतर गावाबाहेर नेऊन त्याची गळा चिरुन हत्या केली. आज सकाळी मलमपोडूरनजीकच्या रस्त्यावर शंकरचा मृतदेह रक्ताच्या थारोळयात आढळून आला. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. शंकर वड्डे याने २०१३ मध्ये काही दिवस एसपीओ म्हणून काम केले होते.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
UFRSO
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना