शनिवार, 27 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

आग पीडित कुटुंबीयांच्या मदतीला धावून आले आविसं कार्यकर्ते

Saturday, 20th May 2017 06:05:09 AM

 

सिरोंचा, ता.२०: तालुक्यातील वडदम येथे काल पहाटे लागलेल्या आगीत चार कुटुंबांच्या घरांची राख झाल्यानंतर आदिवासी विद्यार्थी संघाच्या कार्यकर्त्यांनी पीडितांना आर्थिक मदतीचा हात दिला.

काल पहाटे वडधम येथील गग्गुरी पोचम जक्कलू ,गग्गुरी किष्टय्या जक्कुलू, मांतय्या नागुला व लक्ष्मण गग्गुरी यांची घरे व घरातील जीवनावश्यक साहित्याची आगीत राखरांगोळी झाली. त्यामुळे चारही कुटुंबांचे संसार उघड्यावर आले. घटनेची माहिती मिळताच सिरोंचा तालुका आदिवासी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी व जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती जयसुधा जनगाम यांनी घटनास्थळाला भेट देऊन आगग्रस्त कुटुंबीयांचे सांत्वन केले.

 तसेच त्यांनी चारही आगग्रस्त कुटुंबीयांना आर्थिक मदत केली. याप्रसंगी आविसंचे तालुकाध्यक्ष बानय्या जनगाम, वडदम ग्रामपंचायतचे सरपंच आकुला मल्लिकार्जुनराव, आविसंचे सल्लागार रवी सल्लम, बट्टी मल्लेश, लक्ष्मण बोल्ले, नागेश अल्लूरी, तिरुपती चिट्याला, अंकेश बोरकुटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते .


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
846LO
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना