शनिवार, 27 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

नाग विदर्भ आंदोलन समितीचे केंद्रीय उपाध्यक्ष प्राचार्य डॉ.अरुण लोखंडे यांचे निधन

Friday, 23rd June 2017 07:51:20 PM

 

अहेरी, ता.२४: स्वतंत्र विदर्भासाठी आग्रही भूमिका घेणाऱ्या नाग विदर्भ आंदोलन समितीचे केंद्रीय उपाध्यक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्य व आलापल्ली येथील राजे धर्मराव कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण लोखंडे(६५) यांचे आज पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन विवाहित मुली आहेत. कुटुंबीय बाहेरगावी असून, ते आल्यानंतरच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मूळचे वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील रोहणा येथील रहिवासी असलेले डॉ.अरुण लोखंडे यांना नाग विदर्भ आंदोलन समितीचे नेते व माजी खासदार दिवंगत राजे विश्वेश्वरराव महाराज यांनी अहेरी येथे आणून त्यांच्याकडे राजे धर्मराव कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाची धुरा सोपविली. त्यांच्याच नेतृत्वात राजे धर्मराव शिक्षण मंडळाने अहेरी उपविभागात शाळा, महाविद्यालयांचे जाळे निर्माण केले. दिवंगत राजे विश्वेश्वरराव महाराज, दिवंगत राजे सत्यवानराव महाराज व राज्याचे विद्यमान आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून प्राचार्य डॉ.लोखंडे यांना ओळखले जात होते. त्यांनी गडचिरोली जिल्हा परिषदेचे तिनदा प्रतिनिधीत्व केले. मृदूभार्षी व सालस व्यक्तिमत्व असलेल्या प्राचार्य लोखंडे यांच्या निधनाबद्दल शैक्षणिक व राजकीय वर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
Y9PSD
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना