शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

वीज कोसळल्याने महिलेचा मृत्यू

Saturday, 24th June 2017 04:59:04 AM

 

मुलचेरा, ता.२४: शेतात काम करुन परत येत असताना घराजवळच अंगावर वीज कोसळल्याने एक महिला जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास कोंडीगाव टोला येथे घडली. ललीता भाऊराव मोहुर्ले(३०) असे मृत महिलेचे नाव आहे.

ललीता मोहुर्ले आज सकाळी शेतावर गेली होती. तेथे काम करुन परत येत असताना दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरु झाला. ती घरी पोहचणार एवढ्यात अंगावर वीज कोसळल्याने ती जागीच गतप्राण झाली. आईचा मृत्यू झाल्याचे कळताच मुलाने हंबरडा फोडला. तिला शवविच्छेदनासाठी अहेरी येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे. ९ जून रोजी मुलचेरा तालुक्यातील धन्नूर येथे वीज कोसळून ४ जण ठार, तर ७ जण जखमी झाले होते. त्यानंतर ही दुसरी घटना आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
530Z3
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना