शनिवार, 27 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

येरकड येथे भ्रूसुरुंगस्फोट; ४ जवान जखमी

Monday, 15th September 2014 07:49:39 AM

 

गडचिरोली,ता़ १५

नक्षल्यांनी केलेल्या भ्रूसुरुंगस्फोटात ४ जवान जखमी झाल्याची घटना आज सोमवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुुमारास धानोरा तालुक्यातील येरकड येथे घडली. चेतन साळवे, नीतेश भ्रांडेकर,  सुभाष समर्थ व माणिक मानकर अशी जखमी जवानांची नावे असून, साळवे व भांडेकर यांची प्रकृती गंभीर आहे़ जखमींना हेलिकॉप्टरने नागपूरला हलविण्यात आले आहे.
धानोरा तालुक्यातील येरकड येथे दर सोमवारी आठवडी बाजार भरतो. अनेकदा येरकड पोलिस मदत केंद्रातील जवान ५ ते १० च्या संख्येत नेहमीच भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी जातात. दरम्यान, आज सायंकाळच्या सुमारास काही पोलिस गावापासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या पोलिस मदत केंद्रातून बाजाराकडे पायदळ जात होते. यावेळी रस्त्यालगत असलेल्या झुडपी जंगलात दबा धरुन बसलेल्या नक्षल्यांनी जमिनीत पेरून ठेवलेल्या स्फोटकांचा स्फोट केला़ यात चार जवान जखमी झाले़  चेतन साळवे व नीतेश भांडेकर हे इंडियन रिझर्व बटालियनमध्ये, तर सुभाष समर्थ व माणिक मानकर हे जिल्हा पोलिस दलात कार्यरत असल्याचे समजते़


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
U81VE
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना