शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

छत्तीसगडचा नक्षल डीव्हीसी राजू धुर्वा यास अटक

Tuesday, 16th September 2014 01:28:10 AM

 
गडचिरोली, ता़१६
छत्तीसगड व सीमावर्ती भागातील गडचिरोली जिल्ह्यातील ११ हून अधिक नक्षल गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला जहाल नक्षलवादी व छत्तीसगडच्या मानपूर विभागीय समितीचा सदस्य राजू उर्फ जेठुराम धुर्वा यास गडचिरोली पोलिसांनी आज(ता़१६) धानोरा तालुक्यातील जंगलातून अटक केली़ मागील सात वर्षांत गडचिरोली पोलिसांनी प्रथमच मोठ्या कॅडरच्या नक्षल्यास अटक केली आहे़

यासंदर्भात पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले की, जिल्हा पोलिस छत्तीसगड सीमेलगतच्या जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना राजू धुर्वा यास अटक करण्यात आली़ ४१ वर्षीय राजू धुर्वा हा छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव जिल्ह्यातील मोहला तालुक्यातील खडगाव येथील रहिवासी आहे़ तो नक्षल्यांच्या मानपूर विभागीय समितीचा सदस्य आहे़ छत्तीसगड व महाराष्ट्रातील अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग होता़ 

दलममध्ये भरती होण्यापूर्वी राजू धुर्वा हा गावात राहून मिलिशियाचे काम करायचा़ नक्षल्यांचा पॉलिट ब्युरो सदस्य गुडसा उसेंडी याने पाठविलेली स्फोटके व अन्य साहित्य तो वेगवेगळ्या दलमना पोहचवून देत असते़ त्यानंतर सप्टेंबर २००७ मध्ये तो छत्तीसगडमधील पल्लेमाडी दलममध्ये सदस्य म्हणून भरती झाला़ दुसर्‍या वर्षी मोहल्ला एलओएसमध्ये त्याची बदली झाली़ २०१२ मध्ये त्याची पल्लेमाडी दलममध्ये डीव्हीसी म्हणून त्याची नियुक्ती झाली़ २०१३ पर्यंत तो तेथे कार्यरत होता़ त्यानंतर तो औंधी दलमचा प्रभारी म्हणून कार्यरत होता़ यापूर्वी गहनगट्टा चकमकीत औंधी दलमच्या उपकमांडरला पोलिसांनी ठार केले होते़ आता कोणताही मोठा नक्षल नेता या दलममध्ये उरला नाही, अशी माहिती पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली़ त्याच्यावर खून, जाळपोळ, चकमक असे ११ गुन्हे दाखल असून, छत्तीसगड पोलिसांनी त्याच्यावर १६ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते, असेही संदीप पाटील यांनी सांगितले़ पत्रकार परिषदेला अतिरिक्त पोलिस अधीक्षक राहूल श्रीरामे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक एम़राजकुमार(अभियान)उपस्थित होते़


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
BYVM7
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना