शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

'विद्याभारती' च्या प्रतिभा रामटेके राज्यपालांच्या हस्ते सन्मानित

Saturday, 14th October 2017 06:04:21 AM

गडचिरोली, ता. १४ : दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्थेद्वारे संचालित गडचिरोली येथील विद्याभारती कन्या हायस्कूलच्या सहायक शिक्षिका तथा गाइडर प्रतिभा रामटेके यांना स्काऊट गाइड संस्थेकडून दिला जाणारा 'बार टू मेडल ऑफ मेरीट' हा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला असून त्यांना मुंबई येथे आयोजित सोहळ्यात राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते नुकतेच सन्मानित करण्यात आले.

मुंबई येथील शिवाजी पार्क दादर पॅव्हेलियन येथे आयोजित या सोहळ्याला राज्यपाल विद्यासागर राव यांच्यासह भारत स्काऊट गाइडचे राज्य आयुक्त भा.ई. नगराळे, अध्यक्ष ज्ञानोबा मुंडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रतिभा रामटेके यांनी स्काऊट, गाइड क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना या राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील अनेक विद्याथ्र्यांनी राज्य व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त केले आहेत. तसेच मेळावे, जांबोरी, सामुदायिक विकास आदी कार्यक्रमांमध्येही भरीव योगदान देत त्यांनी स्काऊट, गाइड चळवळीच्या प्रचार व प्रसारासाठी निरंतर कार्य केले. यापूर्वी त्या राज्य गाइडर होत्या. आता त्या राज्य मंडळ सदस्य आहेत. तसेच गडचिरोली जिल्हा भारत स्काऊट गाइड येथे सहायक जिल्हा आयुक्त आहेत. 

पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थाध्यक्ष प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, उपाध्यक्ष भैयासाहेब ठाकरे, मुनघाटे, मुख्याध्यापक कुमरे, पर्यवेक्षिका चौधरी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच भारत स्काऊट गाइडचे जिल्हा आयुक्त भोसले, चिटणीस लोंढे, सहसचिव खंगार, सेता, स्काऊट संघटक झाडे, गाइड संघटिका माधुरी जवणे आदींनी अभिनंदन केले आहे. तसेच गाइड आयुक्त कविता पोरेड्डीवार, लीना हकिम, समशेर पठाण, प्राचार्य नार्लावर, बोरकर, कोषाध्यक्ष स्मिता लडके आदींनी प्रतिभा रामटेके यांचे अभिनंदन केले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
0K8ZT
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना