मंगळवार, 16 जानेवारी 2018
लक्षवेधी :
   धानोऱ्यात एकाच रात्री सहा ठिकाणी घरफोड्या, नागरिक भयभीत             सरकारी स्वस्त धान्य दुकानातील धान्याची अफरातफर, देसाईगंज पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हे दाखल             पतंगाच्या मांजामुळे दोघे जण जखमी-गडचिरोलीतील घटना           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : गडचिरोली जिल्हयातील गैरआदिवासींच्या प्रश्नांकडे राज्य सरकार डोळेझाक करीत आहे, असे वाटते काय?
होय :
77%
नाही :
23%

सहकारमहर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार यंदाच्या 'गडचिरोली जिल्हा गौरव' पुरस्काराचे मानकरी

Sunday, 31st December 2017 07:09:06 AM

गडचिरोली, ता.३१: गडचिरोली प्रेस क्लबतर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या "गडचिरोली जिल्हा गौरव" पुरस्कारासाठी यंदा सहकारमहर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार यांची, तर विशेष पुरस्कारासाठी एंजल देवकुले हिची निवड करण्यात आली आहे. ६ जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता गोंडवाना कला दालन येथे आयोजित पत्रकार दिन समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

कला, साहित्य, उद्योग, समाजसेवा व अन्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी गडचिरोली प्रेसक्लबतर्फे "गडचिरोली जिल्हा गौरव" पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यंदा या पुरस्कारासाठी अरविंद सावकार पोरेड्डीवार यांची निवड करण्याचा निर्णय गडचिरोली प्रेसक्लबच्या बैठकीत घेण्यात आला. ज्येष्ठ समाजसेवक महाराष्ट्रभूषण डॉ.अभय बंग व गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे यांच्या हस्ते श्री.पोरेड्डीवार यांना सन्मानित केले जाणार आहे. 

अरविंद सावकार पोरेड्डीवार हे जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात ओळखले जाणारे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बँक गेल्या अनेक वर्षापासून प्रतिष्ठेचा कै. वैकुंठभाई मेहता राज्यस्तरीय पुरस्कार पटकावत आहे. राज्यातील अनेक सहकारी बँका डबघाईस आल्या असताना गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आजही आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. एवढेच नव्हे, तर कर्जमाफीची अंमलबजावणी करण्यातही ही बँक अग्रेसर राहिली आहे. 

सहकार क्षेत्राबरोबरच राजकारण व समाजकारणात वेगळा ठसा उमटविणारे अरविंद सावकार पोरेड्डीवार यांना कृषिक्षेत्रातही नवनवीन प्रयोग करण्याचा छंद आहे. वन उत्पादनावरील प्रतिबंध, झुडपी जंगल, वन जमिनीचा अडसर या बाबी जिल्ह्याच्या विकासात अडसर ठरत असल्याने श्री.पोरड्डीवार यांनी वेळोवळी शासनाकडे पाठपुरावा केला. त्यामुळे पोरेड्डीवार यांच्या कार्याची दखल घेऊन गडचिरोली प्रेसक्लबने त्यांना 'गडचिरोली जिल्हा गौरव' पुरस्कारासाठी निवड केली आहे. 

त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रात नावीन्यपूर्ण कामगिरी बजावून गिनीज बwक ऑफ वर्ल्ड रेकार्डमध्ये सिकई मार्शल आर्ट या प्रकारात आपले नाव कोरणारी एंजल विजय देवकुले हिला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 

नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गडचिरोली प्रेसक्लबचे अध्यक्ष अरविंदकुमार खोब्रागडे, उपाध्यक्ष मनोज ताजणे, सचिव अनिल धामोडे, कोषाध्यक्ष अविनाश भांडेकर, सहसचिव महेश तिवारी, सदस्य सर्वश्री सुरेश पद्मशाली, रोहिदास राऊत, सुरेश सरोदे, शेमदेव चाफले, सुरेश नगराळे, मारोती मेश्राम, नंदकिशोर काथवटे, विलास दशमुखे, जयंत निमगडे, रुपराज वाकोडे, नीलेश पटले यांनी केले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
V40T0
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना