शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2018
लक्षवेधी :
  पत्नीची तलावात बुडवून हत्या करणाऱ्या पतीस जन्मठेपेची शिक्षा-गडचिरोलीच्या सत्र न्यायालयाचा निवाडा             भंडाऱ्याचे माजी खासदार नाना पटोले यांची प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती              नक्षल्यांनी केली पोलिस पाटलाची हत्या-एटापल्ली तालुक्यातील घटना             सुशिक्षित बेरोजगारांचा मोर्चा धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर             नागपूर व गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात फ्लॅटस्, प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ७९७२८८०५१३           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : गडचिरोली जिल्हयातील गैरआदिवासींच्या प्रश्नांकडे राज्य सरकार डोळेझाक करीत आहे, असे वाटते काय?
होय :
77%
नाही :
23%

कोनसरीच्या लोहप्रकल्पासाठी लॉयड मेटल्सने एमआयडीसीकडे भरले ६ कोटी रुपये

Thursday, 8th February 2018 09:04:34 AM

गडचिरोली, ता.८: लॉयड मेटल्स कंपनीने आज तत्काळ कोनसरी येथील शेतजमीन संपादित केलेल्या शेतकऱ्यांना देण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे ६ कोटी १ लाख ६९ लाख रुपये जमा केले आहेत. यामुळे लवकरच कोनसरी येथे बहुप्रतीक्षित लोहप्रकल्पाचे काम सुरु होण्याची आशा बळावली आहे.

एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथील पहाडावरील लोहखनिजाची लीज मिळाल्यानंतर लॉयड मेटल्स कंपनीने चामोर्शी तालुक्यातील आष्टीनजीकच्या कोनसरी येथे लोहप्रकल्प उभारण्याची घोषणा केली होती. त्याअनुषंगाने लॉयडने जवळपास ३५ शेतकऱ्यांची सुमारे ५०.२९ हेक्टर शेतजमीन संपादित करुन जमिनीच्या एकूण किमतीच्या १० टक्के रक्कम २६ एप्रिल २०१७ रोजी धनादेशाद्वारे एमआयडीसीला दिली होती. एमआयडीसीने ही रक्कम शेतकऱ्यांना दिली. त्यानंतर १२ मे २०१७ रोजी कोनसरी येथे प्रस्तावित लोहखनिज प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळीही प्रातिनिधीक स्वरुपात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना धनादेश वितरीत करण्यात आले होते. 

परंतु वर्षभर तेथे काहीच काम न दिसल्याने शंकाकुशंकांना पेव फुटले होते. मात्र, ७ फेब्रुवारी २०१८ रोजी एमआयडीसीने संबंधित शेतकऱ्यांना जमिनीच्या मोबदल्यात रक्कम देण्याविषयीचे पत्र लॉयड मेटल्स कंपनीला दिले. या पत्राची दखल घेत लॉयड मेटल्स कंपनीने आज(ता.८) तत्काळ ६ कोटी १ लाख ६९ हजार ८१८ रुपये एमआयडीसीकडे आरटीजीएस केले. आता एमआयडीसी ही रक्कम शेतकऱ्यांना देईल. यामुळे कोनसरी येथील बहुप्रतीक्षित लोकप्रकल्पाचे काम सुरु होण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला असून, येत्या महिनाभरात लोहप्रकल्पाच्या कामास सुरुवात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हा प्रकल्प झाल्यास प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे जिल्ह्यातील बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल, असा आशेचा किरण बेरोजगारांना दिसू लागला आहे.   


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
559V8
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना