शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

स्विफ्ट गाडीची झाडाला धडक; चिमुकला मुलगा ठार, आई-वडील जखमी

Wednesday, 25th April 2018 06:30:29 AM

कुरखेडा,ता.२५: तालुक्यातील पुराडा-मालेवाडा मार्गावरील रामगड गावानजीक असलेल्या तलावाच्या वळणावर आज दुपारी एक वाजताच्या सुमारास चारचाकी वाहनाने झाडाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार, तर दोन जण जखमी झाले.

नक्ष जितेंद्र भरणे या चार वर्षाचा चिमुकल्याचा अपघातात मृत्यू झाला, तर विद्या व जितेंद्र भरणे हे पती-पत्नी जखमी झाले. मात्र सोबत असलेल्या दीड वर्षाच्या चिमुकल्याला कुठलीही इजा झाली नाही.

मालेवाडा येथील जितेंद्र भरणे आपल्या कुटुंबासह गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे आज नातेवाईकांकडे लग्न समारंभासाठी स्वतःच्या स्विफ्ट गाडीने जात असताना रामगड गावशेजारी असलेल्या तलावाच्या वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने चारचाकीने रस्त्यालगतच्या झाडाला धडक दिली. जखमींना पुराडा येथील प्राथमिक आरोग्य पथक येथे प्राथमिक उपचारानंतर कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
4SB00
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना