शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

रस्त्याच्या उजव्या बाजूने चला......!

Wednesday, 25th April 2018 07:57:08 AM

(२३ एप्रिलपासून रस्ते सुरक्षा अभियान राज्यात सुरु झाले आहे. अपघातांची कारणे आणि अपघात टाळण्याचे उपाय याबाबत जनजागृती या अभियानात करण्यात येते. वाढते अपघात कमी करण्यासाठी प्रत्येक जबाबदार नागरिकाने नियम जाणून घेतले व पाळले पाहिजेत. या अभियानानिमित्त हा खास लेख.)

साधे नियम देखील महत्वाचे असतात. पण, त्याचं महत्व किती जणांना कळतंय, हा खरा सवाल आहे. आजकाल रस्त्यावर होणाऱ्या अपघातांच्या बातम्या आपल्याला सवयीच्या झाल्या आहेत. आपण याकडे कधी गांभीर्याने बघतच नाहीत. म्हणून अपघात घडतात. असाच एक नियम म्हणजे "रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे " हा होय. 

आपण शहरी भागात रस्त्यांवरुन चालतो, त्यावेळी सर्वच शहरात फुटपाथ आहेत अशी स्थिती आपल्या देशात नाही. त्यामुळे ज्या रस्त्यावर वाहने धावतात; त्याच रस्त्याचा वापर आपण करतो. बऱ्याच शहरांमध्ये रस्त्यालगत बाजारपेठ आणि त्यातील दुकानांनी मांडलेले साहित्य रस्त्यापर्यंत येते, ज्यामुळे रस्ता अरुंद होतो, त्या अरुंद रस्त्यात वाहन चालक आणि पादचारी यांचा एकत्रित वावर असतो. 

परिवहन विभाग कितीही सांगत असला; तरी ऐकतय कोण? आपल्याकडे प्रत्येकजण रस्त्याच्या डाव्या बाजूने चालतो. उजव्या बाजूने चालल्यास अपघाताची शक्यता खूप कमी होते, याची जाणीव आपणास नाही. पाश्चात्य देशांप्रमाणे आपल्याकडील चारचाकी वाहने "डाव्या बाजूला स्टीअरिंग" (लेफ्ट हँड ड्राईव्ह) असणारी नाहीत. आपल्याकडील वाहने राईट हॅन्ड ड्राईव्हवाली आहेत. त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी ती रस्त्यावर चालवताना रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवली जातात. वाहने रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवली जातात आणि आपणदेखील त्याच बाजूने चालतो. यामुळे आपणास मागील बाजूने येणारे वाहन शक्यच नसते.  मागून येणाऱ्या वाहन चालकाचा जरासा अंदाज चुकला तर वाहन आपल्या अंगावर येते आणि अपघात  होतो. आपण उजव्या बाजुने चालत असताना आपली दिशा वाहनाच्या विरुध्द बाजूने चालत असताना आपली दिशा वाहनाच्या विरुध्द असते आणि त्यामुळे येणारी सर्व वाहने आपणास दिसत असतात. परिणामी असे अपघात टाळणे शक्य होते. 

पायी चालणाऱ्यांमध्ये कायम दिसून येणारी चूक तर अधिक गंभीर आहे. लहान मुलांना घेऊन जेंव्हा रस्त्यावर आपण चालतो; त्यावेळी सर्वच वेळा मुलाला उजव्या हाताने धरतो. मूल थेट रस्त्यावर वाहतुकीच्या दिशेने असते. लहान मुलांचा स्वभाव चंचल असतो. साध्या साध्या गोष्टींचे आकर्षण त्यांना असते. त्यामुळे चटकन पालकांचा हात सोडून ते धाव घेतात आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पळण्याचा प्रयत्न करतात. या प्रकारे अनेक मुलं अपघातांना बळी पडलेली आहेत. मुलांबाबत आपणच काळजी घेतली पाहिजे. 

त्यामुळे यापुढे मॉर्निंग असो की इव्हनिंग वॉक; चालताना रस्त्याच्या उजव्या बाजूने चला आणि सुरक्षित रहा. 

- प्रशांत दैठणकर

जिल्हा माहिती अधिकारी, गडचिरोली 

९८२३१९९४६६


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
HB31V
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना