शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

माजी आमदार आनंदराव गेडाम यांची आदिवासी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

Wednesday, 25th April 2018 07:46:44 PM

गडचिरोली, ता.२६: आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार आनंदराव गेडाम यांची आदिवासी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोक गहलोत यांनी काल(ता.२५) आनंदराव गेडाम यांच्या नियुक्तीचे पत्र जारी केले. श्री.गहलोत यांनी तीन राज्यांच्या आदिवासी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती केली. त्यात अमरजित भगत(छत्तीसगड), डॉ.सुशील मरांडी(झारखंड) व आनंदराव गेडाम(महाराष्ट्र) यांचा समावेश आहे.

आनंदराव गेडाम हे २००४ ते २०१४ अशी दहा वर्षे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार होते. तत्पूर्वी ते जिल्हा परिषद सदस्यही होते. आदिवासी विद्यार्थी संघाच्या चळवळीतून श्री.गेडाम यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. १९८६ मध्ये आरमोरीत केवळ १८ आदिवासी विद्यार्थी शिकत असताना श्री.गेडाम यांनी आरमोरीत आदिवासी विद्यार्थी संघाची स्थापना केली. त्यावेळी ते शाखेचे सचिव होते. त्यानंतर त्यांनी चंद्रपूर व भंडारा जिल्ह्याचे आविसंचे संघटक म्हणूनही काम केले. पुढे ते युवक काँग्रेस व काँग्रेसमध्ये सक्रिय झाले. युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून श्री.गेडाम यांनी काम केले. १९९९ मध्ये आनंदराव गेडाम यांनी काँग्रेस पक्षाकडून आरमोरी विधानसभेची निवडणूक लढली. मात्र, ते अवघ्या ४०६ मतांनी पराभूत झाले. त्यानंतर २००२ मध्ये ते जिल्हा परिषदेवर निवडून गेले. पुढे २००४ ते २०१४ अशी दहा वर्षे ते आमदार राहिले.

आमदारकीच्या कार्यकाळात त्यांनी विधिमंडळाच्या भटक्या व विमुक्त जमाती कल्याण समितीचे प्रमुखपद भूषविले. २००८-२०१० या कालावधीत वनविकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणूनही श्री.गेडाम यांनी काम केले. हा दीर्घ अनुभव व आदिवासींच्या हितासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने आनंदराव गेडाम यांची आदिवासी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. या नियुक्तीबद्दल श्री.गेडाम यांचे चाहत्यांनी अभिनंदन केले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
0I26G
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना