शनिवार, 27 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

पी.एस. पाटील महावितरणचे नवे मुख्य जनसंपर्क अधिकारी

Wednesday, 2nd May 2018 06:51:35 AM

मुंबई, ता.२: महावितरणचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून पी. एस. पाटील यांची पदोन्नतीने नुकतीच निवड करण्यात आली आहे. महावितरणचे व्यवस्थापन आणि प्रसार माध्यमे, ग्राहक व इतर घटकांमध्ये उत्तम समन्वय साधून काम करणारे, तसेच दांडगा जनसंपर्क असणारे अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. या पूर्वी ते सहमुख्य जनसंपर्क अधिकारी(१) या पदावर कार्यरत होते.

१९९२ साली सरळ सेवेतून त्यांची तत्कालीन महाराष्ट्र राज्य विदयुत मंडळात जनसंपर्क अधिकारी म्हणून निवड झाली. त्यानंतर उपमुख्य जनसंपर्क अधिकारी, सहमुख्य जनसंपर्क अधिकारी-(१) या पदांसह शिष्टाचार अधिकारी या पदाची धुरा त्यांनी मागील अनेक वर्षापासून यशस्वीरित्या सांभाळली आहे. पी.एस. पाटील यांच्या नेतृत्वात महावितरणच्या जनसंपर्क विभागाने अधिक भरीव कामगिरी करत जनसंपर्क विभागाला नवे आयाम मिळवून दिले आहे. पी.एस. पाटील यांच्या कामातील तत्परता, मनमिळावू स्वभाववृत्तीमुळे जनसंपर्क विभाग यशस्वी कामगिरी करीत असून त्यातून उत्तम समन्वय, चांगली प्रतिमा निर्मिती व ग्राहकांचा पाठिंबा मिळविण्यात, प्रभावी जनमत घडवून ग्राहक जागृती करण्यात महावितरणला यश मिळाले आहे. श्री. पाटील यांच्या या प्रभावी कामाची दखल घेत महावितरण व्यवस्थापनाने पदोन्नतीने त्यांची मुख्य जनसंपर्क अधिकारीपदी निवड केली आहे.

पी.एस. पाटील हे मुळचे पिशवी (ता. शाहुवाडी, जि कोल्हापूर) येथील रहिवासी असून महावितरणमध्ये रूजू होण्यापूर्वी त्यांनी कोल्हापूर येथून दैनिक 'पुढारी' मध्ये पत्रकार म्हणून काम केले आहे. शैक्षणिक, सामाजिक आणि विविध सामाजिक संस्थेत ते सक्रियपणे कार्यरत आहेत. राज्याच्या सहकार क्षेत्रात भरीव योगदान देणारे दिवंगत खासदार उदयसिंगराव गायकवाड यांची प्रेरणा व आदर्श यामुळेच आपण या पदापर्यन्त पोहचलो, असे श्री. पाटील यांचे कृतज्ञतापूर्वक म्हणणे आहे. श्री. पाटील यांच्यापूर्वी या पदावर राम दोतोंडे कार्यरत होते.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
VV45Z
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना