शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी केली इसमाची हत्या

Friday, 4th May 2018 11:27:19 PM

गडचिरोली, ता.५: पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन काल रात्री नक्षल्यांनी धानोरा तालुक्यातील हुर्रेकसा येथील एका इसमाची गोळी घालून व तीक्ष्ण शस्त्राने वार करुन हत्या केली. पांडुरंग गांडोजी पदा(४६) असे मृत इसमाचे नाव आहे.

काल रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास ३० ते ४० सशस्त्र नक्षलवादी पांडुरंगच्या घरी गेले. त्यांनी पांडुरंगला झोपेतून उठवून दोनशे मीटर अंतरावर असलेल्या त्याच्या शेतात नेले आणि चेहऱ्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन त्याची हत्या केली. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे. 

घटनास्थळी नक्षल्यांनी पत्रक टाकल्याचे आढळून आले आहे. ८ मे २०१६ रोजी जहाल नक्षलवादी व चातगाव एरिया कमिटीची सचिव रजिता उर्फ रामको ऋषी उसेंडी पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाली होती. तिची माहिती पांडुरंग पदा यानेच दिली, असा आरोप पत्रकात करण्यात आला आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
EH41W
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना