शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

वऱ्हाड्यांच्या वाहनाला अपघात;१ ठार, ५० जण जखमी

Wednesday, 9th May 2018 01:48:46 AM

सिरोंचा, ता.९: लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारे वाहन झाडाला आदळल्याने १ महिला ठार, तर ५० जण जखमी झाल्याची घटना आज सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास सिरोंचा-आलापल्ली मार्गावरील मौसम गावाजवळ घडली. 

झिंगानूर येथून वऱ्हाडी घेऊन निघालेला मेटॅडोर गडचिरोलीकडे जात होता. दरम्यान मौसम गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन झाडाला आदळले. यात सुमारे ५० जण जखमी झाले. जखमींना अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. उपचारादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला. गंभीर जखमींना चंद्रपूरला हलविण्यात आले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
TAERA
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना