शनिवार, 27 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

पोलिसांनी अडविले तेंदूपानांचे ट्रक; दोषींवर कारवाईची शेकापची मागणी

Saturday, 2nd June 2018 07:28:29 AM

गडचिरोली, ता.२:ग्रामसभांनी तोडलेल्या तेंदूपानांची वाहतूक करणारे ट्रक कसनसूर पोलिसांनी अडविल्याने ग्रामसभांचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. ग्रामसभांनी दिलेला वाहतूक परवाना असतानाही ट्रक थांबविणे म्हणजे वनाधिकार कायद्याच्या अंमलबजावणीत नाहक अडथळा निर्माण करणे होय. त्यामुळे जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस रामदास जराते यांनी केली आहे.

रामदास जराते यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, यंदा घोटसूर परिसरातील ६ ग्रामसभांनी स्वता: तेंदूपानांचे संकलन केले. या तेंदूपानांची राजोली, मुल येथील गोदामात साठवणूक करण्याकरिता आजपासून वाहतूक सुरू करण्यात आली. वाहतुकीकरिता वनविभागाकडून टी.पी.बूक घेऊन ग्रामसभेने संबंधित वाहनांना टी.पी.जारी केली. मात्र, सकाळपासून कसनसूर पोलिसांनी पोलिस ठाण्यासमोर दोन ट्रक तेंदूपानासह थांबवून ठेवले आहेत. एकीकडे एट्टापल्ली तालुक्यातील इतर ग्रामसभांनी तेंदूपत्ता न तोडल्याने लोकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले असतांना घोटसूर परिसरातील ६ ग्रामसभांनी तोडलेल्या तेंदूपानांचे ट्रक थांबविण्याचा प्रकार चिरीमिरीकरिता आहे. 

त्यामुळे चिरीमिरीकरिता नाहक त्रास देणा-या संबंधित पोलिस अधिकाऱ्‍यावर पोलिस अधीक्षकांनी तत्काळ कारवाई करावी व ग्रामसभेला तेंदूपानांची वाहतूक करण्यास सहकार्य करावे, तसेच वनाधिकार कायद्याच्या अंमलबजावणीत अडथळा निर्माण केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांवर कारवाई करावी,अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस रामदास जराते यांनी केली आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
U47AH
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना